अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 66 जणांची नोंदणी निलंबित

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 66 जणांची नोंदणी निलंबित

८ (पान २ साठीमेन, ग्राफीकपद्धतीने घ्यावे)

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्याची नोंदणी निलंबित

६६ जणांचा समावेश ; आरटीओ-एसटीच्या भरारी पथकाची कामगिरी ; वर्षभरात मिळाला ५ कोटीचा महसूल

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध जोरदार मोहीम सुरूच आहे. रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि राज्य परिवहन एसटी महामंडळ यांच्या संयुक्त पथकाने दोषी आढळलेल्या १६३ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १७ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईत ६ वाहनांची नोंदणी वर्षभरासाठी निलंबित करण्यात आली आहे. कारवाईत वर्षभरात ५ कोटीचा महसूल मिळाला.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एसटीचे महामंडळाचे उत्पन्न दिवसेंदिवस घटत आहे. एसटीच्या थांब्याजवळ थांबून प्रवाशांना आपल्याकडे खेचणाऱ्या आणि संख्यामर्यादा ओलांडून त्यांची वाहतूक आरटीओ कार्यालय आणि राज्य परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त पथकाने गेल्या आर्थिक वर्षात अशा वाहनांवर कायद्याचा बडगा उगारत कारवाई केली.

या कारवाईत २ हजार ६७७ वाहनांची तपासणी करण्यात आली. यात १६३ वाहने दोषी आढळले. त्यापैकी १६ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली तर ६६ वाहनांची वर्षभरासाठी नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. काही वाहनांकडून ८ हजार रुपये न्यायालयीन दंड वसूल करण्यात आला तर कर वसुलीतून ३५ हजार ५९ लाख ८०१ रुपये तर १७ लाख ३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. कार्यालयाला विविध वाहनांचे दंड, चालू कर तसचे थकित करापोटी ५०१ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात वाहन चालवताना, मोबाईलवर बोलताना, शालेय विद्यार्थी वाहतूक, अवजड सामानाची वाहतूक करणारे नागरिक आदी विविध कारवाईंचा समावेश आहे.
-
चौकट
वाहनांची तपासणी
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या १९४८ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७० दोषी वाहनांकडून ४ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला तर १ लाख ३० हजार १७२ करवसुली केली आहे.
--
क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक
अवजड सामानांची विनापरवानगी वाहतूक करणाऱ्या ७ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे तर वर्षभरात तपासलेल्या १३२ वाहनांकडून १ लाख ६६ हजार १६१ रुपयाची करवसुली करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या १९ वाहनांवर कारवाई करत ३ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
--
विनागणवेश चालकांना दंड
रिक्षा चालवणाऱ्या १६ चालकांनी गणवेश न घातल्याने त्यांच्याकडून १६ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली. तसेच सार्वजनिक मार्गावर थांबवलेल्या १०६ वाहनांवर कारवाई करून तब्बल २८ लाख ४५ हजार ४०० रुपयांचा दंड तसेच टॅक्स वसूल केला.
---------------

हेल्मेट संबधी कारवाई
महामार्गावर ये-जा करणाऱ्या १६ हजार ३६४ दुचाकी वाहनांपैकी १६४२ चालक आणि चालकामागील ४४ व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करून ६० हजार ५०० रुपयांचा दंड भरारी पथकाने वसूल केला.
--

मोबाईलवर बोलणाऱ्यांवर कारवाई

मोबाईलवर बोलत वाहन चालवणाऱ्या १७३ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४३० हजार ७०० रुपये दंड वसूल केला तसेच अवजड सामानांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ७ दोषी वाहनांकडून १ लाख २४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com