डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कांदळगावात उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कांदळगावात उत्साहात साजरी

swt1843.jpg
96944
कांदळगावः बुद्धविहार येथे आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
कांदळगावात उत्साहात साजरी
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : कांदळगाव सम्राट अशोकनगर येथील बुद्धविहार येथे सिद्धार्थ विकास मंडळ आणि यशोधरा महिला मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉ. आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य धम्मरॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.
धम्म ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला ग्रामपंचायत सदस्य अनघा कदम आणि राजेंद्र कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीला उपासक क. शि. कदम, ल. का. कदम, अशोक कदम, सुनीता कदम, वाघमारे यांनी वंदन केले. आंबेडकर जयंतीनिमित्त कांदळगाव सरपंच रणजित परब, उपसरपंच दिव्या बागवे आदी सदस्य तसेच ग्रामसेवक सागर देसाई यांनी बुद्धविहार येथे भेट देत शुभेच्छा दिल्या. आयपीएस अधिकारी सुमेध कदम यांच्याकडून भोजनदान देण्यात आले. रात्री डॉ. बाबासाहेबांच्या जीवनावर अर्णव कदम, श्रीतेज कदम, कश्यप कदम, स्वरंग कदम, यश कदम, श्रेया कदम, युतिका कदम या लहान मुलांनी भाषण केले. आदर्श शिक्षक नितीन कदम, आयपीएस अधिकारी कदम, माजी आयकर अधिकारी प्रभाकर कदम यांनी मार्गदर्शन केले. आयपीएस अधिकारी सुमेध कदम यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सतीश कदम यांनी केले. उदय कदम यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com