आकाश निरीक्षणाचा लाभ 55 जणांनी घेतला

आकाश निरीक्षणाचा लाभ 55 जणांनी घेतला

१५ (टूडे ३ साठी)

- rat१९p३.jpg ः
९७०३४
हर्णै ः अत्याधुनिक टेलिस्कोपच्या मदतीने शुक्र, शनी, चंद्र, सूर्य यांच्यासहित अनेक तारका समूहांचे निरीक्षण करताना विद्यार्थी

आकाश निरीक्षणाचा ५५ जणांनी घेतला लाभ

हर्णै, ता. १९ ः शारदा क्लासेस, दापोली आणि आर्क एज्युकेटर्स, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘नाईट स्काय ऑब्जर्वेशन’ म्हणजेच ‘अवकाश निरीक्षण सत्र’ जालगाव येथील श्री शैल्य हॉल येथे दिमाखात पार पडले. या सत्राची सुरवात १५ एप्रिलला संध्याकाळी ६ वाजता झाली तर १६ एप्रिलला सकाळी ७ वाजता पूर्ण झाले. या सत्रात विद्यार्थी तसेच इतर वयोगटातील इच्छुकांनी आपली हजेरी लावली. एकूण ५५ लोकांनी आकाश निरीक्षणाचा लाभ घेतला. आर्क एज्युकेटर्स मुंबईतर्फे, खगोलशास्त्रातील तज्ञ सचिन मिश्रा आणि हिमांशू अगरवाल यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. अत्याधुनिक टेलिस्कोपच्या मदतीने शुक्र, शनी, चंद्र, सूर्य यांच्यासहित अनेक तारकासमुहांचे निरीक्षण करण्यात आले. तसेच आकाश निरीक्षणाचा इतिहास, राशी, नक्षत्र, ताऱ्यांची नावे या सर्व गोष्टी प्रथम सत्रात समजून घेतल्या. त्यावर आधारित खेळांनाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कॅम्प साईटवर उभे केलेले टेन्ट विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचा विषय होता. सहभागी झालेल्यांनी मोबाईल फोनमधून ॲस्ट्रोफोटोग्राफी कशी करायची, याचाही अभ्यास केला. आकाश निरीक्षण उत्तमरित्या पार पडले व पुन्हा नक्की आकाश निरीक्षण करायला आवडेल, असे मत सर्वच सहभागी लोकांनी मांडले. या सत्रामुळे मुलांमध्ये आकाश निरीक्षणाची ओढ व कुतूहल अजून निर्माण झाले ही बाब फार समाधानाची आहे, अशी प्रतिक्रिया कार्यक्रमाचे आयोजक शारदा क्लासेसच्या शिक्षकांनी व्यक्त केली.

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com