एस. टी. महामंडळाच्या नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम

एस. टी. महामंडळाच्या नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम

kan१९१.jpg
९७१७७
छत्रपती संभाजीनगरः येथे झालेल्‍या एस. टी. महामंडळाच्या नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग विभागाच्या ‘दशावतार गोविंद हरिश्‍चंद्राचो’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळविला.

एस. टी. महामंडळाच्या
नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग प्रथम
कणकवली, ता. २० : एस. टी. महामंडळाच्या नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग विभागाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ‘दशावतार गोविंद हरिश्‍चंद्राचो’ हा नाट्यप्रयोग सिंधुदुर्ग विभागाने सादर केला होता. या नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्या (ता. २१) सायंकाळी सहा वाजता आचरेकर प्रतिष्‍ठानच्या रंगमंचावर होणार आहे. यावेळी एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, आणि अण्णा नाईक फेम अभिनेते माधव अभ्यंकर उपस्थित राहणार आहेत.
एस. टी. महामंडळाच्या राज्‍य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या लातूर, सातारा, नांदेड आणि पुणे येथील केंद्रावर झाल्‍या. यातील सातारा केंद्रावरील विभागीय फेरीत सिंधुदुर्ग विभागाने प्रथम क्रमांक मिळविला. त्‍यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे अंतिम फेरी झाली. या फेरीतही सिंधुदुर्ग विभागाने प्रथम क्रमांक मिळविला. यात सिंधुदुर्ग विभागाच्या मारूती मेस्त्री यांनी उत्कृष्‍ट अभिनय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तर अंकुश कारेकर आणि सुविध कदम यांनीही अभिनयामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.
कणकवलीतील आचरेकर प्रतिष्‍ठानच्या रंगमंचावर २१ रोजी सायंकाळी सहा वाजता नाट्य स्पर्धेतील विजेत्‍या दशावतार गोविंद हरिश्‍चंद्राचो या नाटकाचा प्रयोग होणार आहे. यावेळी विभागीय आणि अंतिम फेरीतील विजेत्‍या संघांना गौरविण्यात येणार असल्‍याची माहिती एस. टी. सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com