हिंदी आत्मीयतेने आत्मसात करा

हिंदी आत्मीयतेने आत्मसात करा

swt2012.jpg
97296
वेंगुर्लेः हिंदी प्रचार सभेतर्फे आदर्श हिदी अध्यापकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हिंदी आत्मीयतेने आत्मसात करा
आत्माराम सोकटेः वेंगुर्लेत प्रचार सभेचा वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २०ः हिंदी भाषेला मोठी ज्ञानपरंपरा व साहित्यिक पार्श्वभूमी लाभली आहे. विचारांचे आदान प्रदान करण्याची संपूर्ण भारतीय उपखंडातील ही एक महत्त्वाची भाषा आहे. देशातील आजच्या व्यापार जगताची मुख्य भाषा सुद्धा हिंदीच आहे. त्यामुळे मातृभाषा मराठी व ज्ञानभाषा इंग्रजी सोबतच तितक्याच आत्मीयतेने हिंदी भाषा आत्मसात करा, असे आवाहन रा. कृ. पाटकर व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक ज्येष्ठ सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्ते आत्माराम सोकटे यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
येथील हिंदी प्रचार सभेचा वर्धापन दिन सोहळा व आदर्श हिदी अध्यापक पुरस्कार वितरण सोहळा नगरवाचनालयाच्या सभागृहा झाला. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष का. हु. शेख, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक सत्यवान पेडणेकर, आसोली हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर, कार्यवाह महेश बोवलेकर, आदर्श शिक्षक विद्याधर कडुलकर, चित्रा प्रभुखानोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी (कै.) सुशिला श्रीकृष्ण सौदागर स्मृती आदर्श हिंदी अध्यापिका पुरस्कार उभादांडा क्र. 1 च्या पदवीधर शिक्षिका मनाली कांबळी यांना, (कै.) श्रीपाद कृष्ण पुराणिक स्मृती आदर्श हिंदी अध्यापिका पुरस्कार सरस्वती विद्यालय आरवलीच्या श्रद्धा सोनू नाईक-तांडेल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महेश बोवलेकर यांना वेगवेगळ्या पाच संस्थांनी आदर्श शिक्षक म्हणून गौरविल्याबाबत त्यांचाही संस्थेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेतर्फे घेतलेल्य हिंदी विषयाच्या विविध परिक्षांमधून सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
शिक्षक व इतर शासकीय कर्मचाऱ्यांना दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांना हिंदी विषय घेऊन उत्तीर्ण होण्याची अट शासनाने अनिवार्य केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना बोर्ड परीक्षेला हिंदी विषय घेता आला नव्हता, अशा शासकीय कर्मचारी, शिक्षकांना आपल्या संस्थेद्वारा हिदी विषयाच्या पंडितपर्यंतची परीक्षा देता येते, अशी माहिती का. हु. शेख यांनी दिली.
प्रास्ताविक महेश बोवलेकर, सूत्रसंचालन जिल्हा परिषद आदर्श शिक्षिका चित्रा प्रभुखानोलकर यांनी केले. आभार विद्याधर कडुलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुरुदास मळीक, दीपाली परब व पूजा धावडे यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com