जठार यांच्या खासदारकीसाठी सर्वतोपरी प्रयत्‍न

जठार यांच्या खासदारकीसाठी सर्वतोपरी प्रयत्‍न

kan२०७.jpg
९७४१९
कासार्डे : येथील अभिषेक मंगल कार्यालयात भाजपचे प्रदेश चिटणीस आणि माजी आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी नीलेश राणे, मनीष दळवी, अतुल काळसेकर आदी उपस्थित होते.


जठार यांच्या खासदारकीसाठी सर्वतोपरी प्रयत्‍न
नीलेश राणे यांची ग्वाही; कासार्डे येथे वाढदिवस सोहळा
कणकवली, ता. २० : सन २००९ च्या निवडणुकीत मी खासदार म्‍हणून तर प्रमोद जठार आमदार म्‍हणून निवडून आले. आता श्री.जठार यांचा लोकसभेचा प्रवास सुरू झाला आहे. ते खासदार होण्यासाठी चिपळूणपासून दोडामार्गपर्यंत जी काही मदत लागेल ती मनापासून करणार असल्‍याची ग्‍वाही माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी दिली.
कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयात भाजपचे नेते प्रमोद जठार यांचा वाढदिवस कार्यक्रम झाला. यात नीलेश राणे यांनी मनोगत मांडले. यावेळी माजी आमदार विनय नातू, अजित गोगटे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, संचालिका प्रज्ञा ढवण, डॉ. मिलिंद कुलकर्णी, उद्योजक विशाल परब, श्री. दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
नीलेश राणे म्‍हणाले, सन २००९ च्या निवडणुकीत जठार आमदार झाले तर मी रत्‍नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार झालो. पण २०१४ मध्ये आम्‍हा दोघांचीही विकेट पडली. पण आम्‍ही पुन्हा पिचवर आलो आहोत. यात श्री. जठार यांच्या खासदारकीच्या प्रवासासाठी आम्‍ही सर्वतोपरी मदत करणार आहोत. तर सिंधुदुर्गातील तीनही मतदारसंघात भाजपचाच झेंडा फडकणार आहे.
राणे म्‍हणाले, सन २०१९ मध्ये भाजपमध्ये आल्‍यानंतर सर्वात आवडणारा माणूस म्‍हणजे प्रमोद जठार. ज्‍या विषयात कुणी जात नाही, तो विषय घेऊन मार्गी लावण्याची धमक श्री. जठार यांच्यामध्ये आहे. कोकणवासीयांच्या भल्‍यासाठी जठार यांनीच रिफायनरी प्रकल्‍पासाठी जोरदार प्रयत्‍न सुरू ठेवले आहेत. ज्‍यावेळी रिफायनरी उभी राहिल, त्‍यावेळी पहिला सॅल्युट प्रमोद जठार यांनाच असेल.
दरम्‍यान दिवसभराच्या कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली यांनी सुद्धा प्रत्यक्ष भेटून प्रमोद जठार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com