विविध विकास कामांसाठी निविदा

विविध विकास कामांसाठी निविदा

गोळवण ग्रामपंचायतीचे आवाहन
कणकवली ः मालवण तालुक्यातील गोळवण, कुमामे, डिकवल या ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने विकास निविदा जाहीर केली आहे. मान्यताप्राप्त मक्तेदारांकडून सीलबंद निविदा मागविल्या असून २८ एप्रिलला निविदा सादर करावयाची आहे. गोळवण येथे पिण्याच्या पाण्याची तळी बांधणे पंधराव्या वित्त आयोगातून एक लाख ९८ हजार ८७० रुपये मंजूर आहेत. या कामाच्या अटी शर्तीची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे, असे सरपंच ग्रामपंचायत गोळवण यांनी कळवले आहे.

बांधकाम विभागातून निविदा जाहीर
कणकवली ः सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यासाठी निविदा जाहीर केली आहे. यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील तुळस तलाठी कार्यालय इमारत बांधकाम करणे २२ लाख ७७ हजार, सावंतवाडी तालुक्यातील मडुरा तलाठी कार्यालय बांधकाम २४ लाख ३० हजार रुपये, कुडाळ येथील तलाठी कार्यालय इमारत दुरुस्ती व मजबुतीकरण २२ लाख ७४ हजार रुपये तर दोडामार्ग येथील तहसील कार्यालयाची दुरुस्ती करणे २९ लाख ५७ हजार रुपये निधी मंजूर आहे. निविदा ८ मे पर्यंत उपलब्ध असून ही निविदा १० मे रोजी खुली केली जाणार आहे. मक्तेदारांनी ई- निविदा प्रणालीचा उपयोग करावा, असे कार्यकारी अभियंता सावंतवाडी यांनी कळविले आहे.

कलमठ ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवली ः कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने विविध कामांसाठी विकास निविदा जाहीर केली आहे. नोंदणीकृत कंत्राटदारांकडून निविदा मागविली असून यासाठी २८ एप्रिलपर्यंत निविदा सीलबंद लखोट्यात ग्रामपंचायत कार्यालय कलमठ येथे सादर करावी. प्राप्त झालेली निविदा दोन मे रोजी उघडण्यात येणार आहेत. यामध्ये कलमठ बिडेवाडी अंगणवाडी छप्पल दुरुस्ती करणे एक लाख पन्नास हजार रुपये, कलमठ बौद्धवाडी अंगणवाडी छप्पल दुरुस्ती करणे एक लाख पन्नास हजार रुपये. प्रबुद्धनगर रस्ता डांबरीकरण करणे चार लाख नऊ हजार पाचशे नव्वद रुपये, प्रबुद्धनगर स्ट्रीट लाईट दिवाबत्ती करणे सात लाख ४९ हजार ९३८ रपये आणि कलमठ चर्मकार समाज स्मशानभूमी जागा सपाटीकरण करणे एक लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कामाच्या अटी शर्तीची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे असे सरपंच ग्रामपंचायत कलमठ यांनी निवेदीतून जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com