कुडाळ नगरपंचायतर्फे अभिनव उपक्रम

कुडाळ नगरपंचायतर्फे अभिनव उपक्रम

कुडाळ नगरपंचायतर्फे अभिनव उपक्रम
नगरविकास दिनः गतिमान कारभारासाठी मागविल्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २१ः नगरविकास दिनाचे औचित्य साधून येथील नगरपंचायत प्रशासनाकडून अभिनव उपक्रम सुरु करण्यात येत आहे. नगरपंचायत कार्यालयाचे प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीकोनातून शहरातील सुजाण नागरिकांकडून प्रशासनात सुधारणा होण्यासाठी सूचना मागविण्यात येत आहेत.
नगरपरिषद प्रशासन संचलनालय यांच्यामार्फत गुरुवार (ता. २०) नगर विकास दिन साजरा करण्यात आला. नगरपरिषद प्रशासन संचलनालय यांच्या अंतर्गत कोकण विभागीय सर्व नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या जिल्हा प्रशासन कार्यालयात नगर विकास दिन साजरा करण्याबाबत निर्देश जारी केले होते. प्रशासनात पारदर्शकता निर्माण होण्यासाठी नागरिक व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्यात सुसंवाद निर्माण होणे आवश्यक आहे. या दृष्टीने अभिनव उपक्रम येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी श्रीमती करिश्मा नायर यांच्याकडून सुचविला आहे. त्यानुसार येथील नगरपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत किंवा पत्राद्वारे तसेच kudalnagarpanchayat@gmail.com येथे मेलद्वारे नागरिकांकडून सूचना स्विकारण्यात येणार आहेत. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग दर्शवून आपल्या सूचना कार्यालयात द्यावयाच्या आहेत. नगरपंचायत अधिनियमाचे उल्लंघन न होता ज्या सूचनांची अंमलबजावणी करता येईल, अशा सर्व सुचनांचा अभ्यास प्रशासनाकडून करण्यात येईल, असे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com