साक्षी जाधवचे यश

साक्षी जाधवचे यश

१८ (टुडे पान २ साठी, संक्षिप्त)

-ratchl२१२.jpg
९७४८९
साक्षी जाधव
-ratchl२१३.jpg
९७४९०
सुजल जोशी
--
स्पंदनमध्ये साक्षी जाधव द्वितीय

चिपळूण ः विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, अभ्यासाबरोबर त्यांच्यातील कलांचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक दरवर्षी स्पंदन या कार्यक्रमाचे आयोजन करते. त्यांच्याशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना यात भाग घेण्यासाठी प्रेरित करते. यावर्षीच्या स्पंदन कार्यक्रमात ललित कला या विभागात लोटे येथील एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. नर्सिंग महाविद्यालयातील एकूण ३ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यामध्ये साक्षी जाधव या विद्यार्थिनीला ऑन दी स्पॉट पेंटिंगमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पक्षी आणि पर्यावरण या विषयावर तिने पेंटिंग केले होते. त्याचप्रमाणे सुजल जोशी या विद्यार्थ्याला स्पॉट पोस्टर मेकिंगमध्ये तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. मानव आणि पर्यावरण या विषयावर त्याने पोस्टर बनवले होते. विद्यापिठाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात दोघांचा सत्कार करण्यात आला. एमईएसआयएचएसचे डायरेक्टर डॉ. श्याम भाकरे, प्राचार्य मिलिंद काळे व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.
--

फोटो ओळी
- rat२१p३.jpg -
९७५००
शिरगाव ः व्यक्तिमत्व विकास शिबिरात विद्यार्थिनींना कथ्थक नृत्याचे धडे देताना सोनम जाधव.
-
नेने हायस्कूलमध्ये कथ्थक नृत्याचे मार्गदर्शन

रत्नागिरी ः शिरगाव येथील वामन नेने हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्व विकास व चारित्र्य संवर्धन शिबिर नुकतेच पार पडले. यामध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध कथ्थक नृत्यशिक्षिका सोनम जाधव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. याशिवाय रत्नागिरी मूकबधीर विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हस्तकला सादर केली. तीन दिवस चाललेल्या या शिबिरात सोनम जाधव यांनी कथ्थकमधील हस्तमुद्रा, पदन्यास आदींबाबत, तसेच एच. डी. जोशी यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. याशिवाय मयुरी घाणेकर यांनी चित्रकला विषयात स्मरणचित्र रेखाटन आणि रंगकाम याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी शैक्षणिक चित्रपट या विषयी मोहन बापट यांनी माहिती दिली. शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रात नेने हायस्कूलच्या शिक्षकांनी ग्रिटिंग कार्डस् बनवणे आणि फनी गेम्स आदींबाबत मार्गदर्शन केले.
--
फोटो ओळी
-rat२१p४.jpg ः
९७५०१
अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे
-
अॅड. हुस्नबानू खलिफेंची नियुक्ती

राजापूर ः काँग्रेसच्या माजी आमदार अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे यांची पुणे येथील डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. पुणे येथील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जात असलेल्या डॉ. पी. ए. इनामदार संस्थेला २०२२ मध्ये शासनाने युनिव्हर्सिटीची मान्यता दिली आहे. या युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय मंडळाची स्थापना करण्यात आली असून, त्याच्या सदस्यदी अ‍ॅड. खलिफे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खलिफे या शिक्षणसंस्थेशी प्रारंभीपासूनच जोडलेल्या आहेत. मौलाना आझान फाउंडेशनच्या संचालिका म्हणून काम करताना त्यांनी या संस्थेच्या विविध उपक्रमांना मोलाचे सहकार्य केले आहे. त्याचवेळी कोकणातील विद्यार्थ्यांना या संस्थेत शिक्षणासाठीही त्या कायमच सहकार्य करत आहे.
-

केळशीत संत गोरा कुंभार पुण्यतिथी

दाभोळ ः दापोली तालुक्यातील केळशी कुंभारवाडा येथे संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यामध्ये जाखमाता देवीची पालखी मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. स्थानिक भजन आणि कीर्तन तसेच शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा असे कार्यक्रम साजरे करण्यात आले. अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजतागायत कुंभार समाजाने जपलेली आहे. या कार्यक्रमासाठी कामानिमित्त परगावी असणारी मंडळीही न चुकता गोराबाकाका पुण्यतिथी या कार्यक्रमासाठी हजेरी लावतात. हा कार्यक्रम तीन दिवस चालतो.
--

उद्यानविद्या महाविद्यालयात डॉ. आंबेडकर जयंती

दाभोळ ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम वणंद येथील माता रमाई स्मारक येथून प्रज्वलित करून आणलेल्या भीमज्योतीचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पराग हळदणकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक योगदान, संविधान जनजागृती याबाबत मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सी. डी. पवार यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी सांस्कृतिक सल्लागार प्रा. डॉ. एम. एम. कुलकर्णी, डॉ. आर. सी. गजभिये, डॉ. वाय. आर. परूळेकर, डॉ. थोरात, डॉ. एस. एस. तोरणे, एस. आर. पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी परिषदेचे सचिव विशाल केळसकर, उपसचिव कोमल वाळके, सांस्कृतिक विभागाच्या ऋतिका साखरकर यांनी केले.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com