गटारांची पावसाळ्यापूर्वी
साफसफाई करा

गटारांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करा

९७५३६

गटारांची पावसाळ्यापूर्वी
साफसफाई करा
मालवण काँग्रेस ः पालिकेस निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २१ ः पावसाळ्या पूर्वी शहरातील गटारांची साफसफाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आज तालुका काँग्रेसच्या वतीने पालिकेच्या अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
पावसाळा सुरू होण्यास काही दिवस राहिले असून शहरामधील पाणी वाहून जाणारी गटारे अद्यापही साफ झाली नाहीत. गेल्यावर्षी लाखो रुपये खर्ची करून देखील अनेक गटारे अर्धवट साफ केल्यामुळे पाणी गटारातून न वाहता रस्त्यावर साचल्याने दिसून आले. त्या गटारांमधील माती गाळ आजही तसाच असल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करत असताना काम मात्र अर्धवट राहतात यावर आम्ही देखील स्वतः प्रशासना सोबत शहरात फिरू. आपल्या सोबत पाहणी करण्यास येऊ, असे सांगितले. आता महिन्याभराने पाऊस येणार असून त्वरित आपण गटारे साफसफाई करून घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अल्पसंख्याक अध्यक्ष सरदार ताजर, युवक काँग्रेसचे देवानंद लुडबे, गणेश पाडगावकर, पल्लवी तारी- खानोलकर, श्रेयस माणगावकर, पराग माणगावकर, योगेश्वर कुर्ले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com