तरंदळेतील मंदिरात विविध कार्यक्रम

तरंदळेतील मंदिरात विविध कार्यक्रम

तरंदळेतील मंदिरात विविध कार्यक्रम
कणकवली ः तरंदळे (ता.कणकवली) येथील श्री देवणादेवी मंदिराचा वर्धापन दिन चार ते सहा मे दरम्यान साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरामध्ये चार मे रोजी सकाळी आठला श्री गांगेश्वर मंदिरात आणि लिंगेश्वर मंदिरात लघुरुद्र, दुपारी महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी सत्कार कार्यक्रम तर रात्री नऊला कीर्तन होणार आहे. तसेच पाच मे रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम त्यानंतर नवचंडिका हवन, दुपारी आरती, महाप्रसाद, रात्री डबलबारी भजनाचा सामना होणार आहे.
---
टेम्पो चालकांवर कारवाई
कणकवली ः शहरांमध्ये वाहतुकीत अडथळा आणणाऱ्या तिघा टेम्पो चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शनिवारी (ता.२२) दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी या टेम्पो चालकांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीत अडथळा होईल अशा पद्धतीने उभ्या असणाऱ्या टेम्पो चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वृषाली बरगे, कॉन्स्टेबल विनोद चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
--------
चिकनच्या दरात वाढ
कणकवली ः इतर महागाईबरोबर आता चिकनच्या दरातही वाढ झाली आहे. गेले काही महिने १८० ते २०० रूपये दर होता. आजच्या रविवारी बॅायलर चिकन नेट २२० रूपये किलोदराने विकले जात होते. उन्हाचा पारा तापल्याने कोंबडीच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे चिकनचे दरही वाढले आहेत. सध्या विवाह सोहळे, सुट्या सुरू झाल्याने चाकरमानी आपल्या कुटूंबासह गावी येत आहेत. परिणामी चिकनची मागणी वाढत आहे. कोकणात मिरज आणि सांगली जिल्ह्यातून कोंबडी आणि अंड्याची आवक मोठ्या प्रमाणात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com