पेंडूर ग्रामविकास अधिकाऱ्याच्या
बदलीसाठी १ मे रोजी उपोषण

पेंडूर ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बदलीसाठी १ मे रोजी उपोषण

पेंडूर ग्रामविकास अधिकाऱ्याच्या
बदलीसाठी १ मे रोजी उपोषण
मालवण, ता. २४ : तालुक्यातील खरारे-पेंडूर ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करून ग्रामपंचायतीला हुशार व जबाबदारीने कारभार सांभाळणारा ग्रामविकास अधिकारी द्यावा, या मागणीसाठी वेळोवेळी निवेदने देऊनही तालुका अथवा जिल्हा प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे माजी सरपंच साबाजी सावंत यांनी १ मे रोजी महाराष्ट्रदिनी आमरण उपोषण छेडण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
सावंत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरारे-पेंडूर ही १२ वाड्यांची मोठी लोकसंख्या असलेली आणि नेहमीच संवेदनशील राहिलेली ग्रामपंचायत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. त्यात प्रशासनाने दिलेले ग्रामविकास अधिकारी बेजबाबदार, निष्क्रिय, कामचुकार आहेत. ग्रामसभेचा अवमान करणे, येणाऱ्या नागरिकांना उत्तर न देणे, असा प्रकार वारंवार घडतो. त्यामुळे अशा बेजबाबदार ग्रामविकास अधिकाऱ्याची तातडीने बदली करण्याबाबत यापूर्वी तालुका व जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरुपात तक्रार वजा विनंती स्वरूपात लेखी निवेदने दिली होती; परंतु या विषयाचा कोणत्याही प्रकारे गांभीर्याने विचार केला जात नाही. त्यामुळे १ मे पूर्वी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली न झाल्यास ग्रामस्थांसोबत पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करू. माझी बायपास सर्जरी झाली असून उपोषण कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारे प्रकृती बिघाड झाल्यास अथवा शारीरिक त्रास झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा माजी सरपंच सावंत यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसे निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com