नवीन वस्त्रहरण

नवीन वस्त्रहरण

पान २ साठी

९८५३८
९८५३९


नव्या रुपातील वस्त्रहरण मुंबई हाऊसफुल्ल
राजापूर, ता. २५ ः ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांनी माडबन गावातील स्थानिक मुलांच्या नव्या संचातील तयार केलेले ‘संगीत वस्त्रहरण’ नाटकाचा प्रभादेवी मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरमध्ये नाट्यप्रयोग झाला. हा नाट्यप्रयोग हाऊसफुल्ल झाला. स्थानिक कलाकारांच्या नाट्यअभिनयाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्तपणे चांगलीच दाद मिळाली.
मुंबई येथे झालेल्या या नाट्य प्रयोगाला माजी आमदार विनोद घोसाळकर, अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, मालवणी सम्राट मच्छिंद्र कांबळे यांचे सुपुत्र प्रसाद कांबळी, रात्रीस खेळ चाले फेम अनुजा पाटील, नंदेश उमप यांच्यासह माडबन, राजापूर तालुक्यासह कोकणातील विविध भागातून रसिक उपस्थित होते. श्री. गवाणकर यांनी स्थानिक गावातील कलाकारांना सोबत घेवून नव्या संचातील वस्त्रहरण नाटकाची निर्मिती केली आहे. नव्या संचातील या नाटकामध्ये माडबन येथील तरूण-तरूणींना कलाकार म्हणून संधी दिली आहे. नव्या संचातील नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबई येथे झाला. नाट्यप्रयोगाच्या यशस्वीततेसाठी नाटककार श्री. गवाणकर आणि त्यांच्या स्थानिक कलाकारांच्या टीमसह मुंबई येथून शैलेश वाघधरे, राहुल वाघधरे, दत्तराज शिरवडकर, मनोज वाघधरे, भालचंद्र होलम, महेश साखरकर, दिनेश शिरवडकर, रेखा गवाणकर, श्रद्धा वैद्य आदींसह मुंबईकर ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com