आंबा प्रक्रिया उत्पादनांच्या दरात वाढ

आंबा प्रक्रिया उत्पादनांच्या दरात वाढ

२३ (टुडे पान ३ साठी, मेन)

आंब्याचा फोटो वापरावा

आंबा प्रक्रिया उत्पादनांचे दर वाढणार

उत्पादनघटीचा परिणाम ; आरंभीला किलोचा दर ६० रुपये

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः बदलत्या वातावरणामुळे आंब्याचा हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. उत्पादन कमी असल्याने यंदाच्या हंगामात कोकणातून प्रक्रिया उद्योगाला पुरेसा आंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. यंदा आंबा उत्पादन कमी असल्याने फळबाजारातील दर स्थिर आहेत. त्यामुळे अंतिम टप्प्यात कॅनिंगसाठीच्या आंब्याचे दर वाढतील. सध्या आरंभीला कॅनिंगचा किलोचा दर ६० रुपयांपर्यंत आहे. परिणामी, आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्‍या उत्पादनांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
हापूस हंगामात प्रक्रिया उद्योगासाठी कॅनिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कॅनिंगसाठी थेट बागायतदारांच्या बागेतूनच आंबा गोळा केला जातो तर काहीवेळा बागायतदार स्वतः व्यावसायिकांकडे आंबा घेऊन येतात. अनेक अडथळे पार करत आंबा फळबाजारात पोहोचत आहेत. मुंबईसह राज्यातील अन्य बाजारपेठांमध्ये आंबा विकला जात आहे. स्थानिक पातळीवरही आंबाविक्रीला विलंबाने सुरवात झाली आहे. तुलनेत यंदा हापूसचे उत्पादन कमी असल्याने सुरवातीपासूनच आंब्याचे बाजारातील दर स्थिर आहेत. पहिला हंगाम आटोपला असून, दुसऱ्या टप्प्यातील आंब्यांची प्रतीक्षा आहे. सध्या आंबा कमी पडत आहे. अजूनही बाजारात हापूसचा दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचा आहे. मुबलक आंबा झाला आणि फळबाजारातील दर घसरले की, आपोआपच प्रक्रिया उद्योगाकडे आंबा वळतो. अजूनही स्थानिक पातळीवर आंबा कॅनिंगला मोठ्या प्रमाणात सुरवात झालेली नाही. बाजारात दरही टिकून असल्याने प्रक्रिया व्यवसायासाठी आंबा यंदा उशिराने सुरू होईल. प्रतवारी करून उरलेला तसेच डागी आंबा कॅनिंगला दिला जातो. कमी उत्पादनामुळे हा व्यवसायही यंदा अडचणीत आला आहे.
काही बागायतदारांकडे आंबा उत्पादन बऱ्यापैकी आहे तर काहींकडे प्रमाण कमी आहे. अजून बागांमध्ये झाडांवर आंबा आहे; मात्र आंबा तयार होण्यासाठी काही कालावधी जाईल, असे चित्र आहे. अखेरच्या टप्प्यातील आंबा बाजारात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात येईल, अशी शक्यता आहे. त्या वेळी बाजारातील दरानुसार कॅनिंगला प्रतिकिलो दर मिळेल. यंदा सुरवातीलाच किलोला ५० ते ६० रु. दर मिळत आले. कॅनिंगचा दरही अधिक असल्याने व्यावसाय करणारे पुढे येत नाहीत. गतवर्षी हाच दर ३५ ते ४० रुपये होता तर जून ते जुलैला ४५ ते ५० रुपयांपर्यंत पोहोचला होता. यावर्षी आरंभीलाच दर चढेच असल्याने शेवटी आंबा कमी राहिला तर कॅनिगवाल्यांची पंचाईत होईल. परिणामी, आंबाप्रक्रिया उत्पादनांचे दर १० ते २० टक्के वाढतील, अशी शक्यता आहे.

-----
कोट

आंबा उत्पादन कमी असल्यामुळे लोणची, जाम, पल्प, वडी, आमरस आदी विविध उत्पादनांच्या दरात वाढ अपेक्षित आहे. कच्च्या मालाच्या किंमती अधिक असल्याने हा परिणाम दिसेल.

- प्रसन्न पेठे, आंबा प्रक्रियादार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com