दशावतारातील उंदीर मामाची आरती

दशावतारातील उंदीर मामाची आरती

प्रवास दशावताराचा

swt277.jpg
98915
प्रा. वैभव केळकर
swt278.jpg
L98916
दशावतारातील गणपती


दशावतारातील उंदीर मामाची आरती

लीड
लाल मातीत रुजलेला आणि आपल्या संस्कृतीचा आरसा असणारी लोककला म्हणजे दशावतार. कोणी तरी म्हणे, दशावतार कर्नाटकातून आणले; पण याला कोणताही भक्कम पुरावा नाही आणि लोककला ही आयात करता येत नसते, कारण तो त्या मातीचा स्वतंत्र आविष्कार असतो. याचे अनेक पुरावे इतिहासात सापडतात. एक स्वतंत्र आविष्कार असलेल्या दशावताराने आपल्या वैविध्येतून आपली लोक आवड आजही जपल्याचे दिसते आणि म्हणूनच आजच्या हायटेक युगात दशावतार लोककलेचा वाढणारा रसिक वर्ग हा दशावतार याच मातीतला आहे, याचा एक भक्कम पुरावा ठरतो. याच मातीतून निर्माण झालेल्या दशावतारात सादर केल्या जाणाऱ्या आरत्यांचा पारंपरिक बाज आजही जपला गेल्याचे दिसते.
- प्रा. वैभव खानोलकर
.................
आड दशावतार सादर करताना रंगमंचावर महागणपतीची महाआरती एका ब्राह्मण वेषातील कलावंत, सूत्रधार आणि रंगमंचावरील संगीत साथीदारांकरवी होते; मात्र ही आरती अस्सल मालवणी भाषेत असते. ती कोणत्याही आरतीच्या पुस्तकात आपल्याला आढळत नाही. त्यानंतर आरती होते ती गणेशाचे वाहन असलेल्या उंदीर मामाची. खरं तर आपली भारतीय संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. भूत, दया हीच ईश्वराची उपासना, हा मार्ग सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ''भुता परस्परो पडो मैत्र जीवांचे'' हे मागणे पसायदान विश्वात्मक देवाकडे मागल्याचे दिसते. तोच भाव दशावतार असल्याचे बघायला मिळते.
ज्ञानेश्वरीतही ज्या दशावताराचा उल्लेख आढळतो, त्यांच ज्ञानियांचा राजाचे तत्वज्ञान समाज प्रबोधनातून मांडणारी लोककला दशावतारात उंदिराची आरती अस्सल मालवणी भाषेतून सादर होते आणि बहुतेक ही एकमेव उंदिराची आरती असावी‌.
जय देव जय देव जय उंदीर मामा !
जय उंदीर मामा !
तुमच्या बोलाची लय गोडी आम्हा !!
रात्रीच्या प्रहरी स्वारीचा थाट !
गाडग्या मडक्यावरी तुमची धडपड !!
अवचित पडता बोक्याची गाठ !
दाढेखाली रगडून करीती चटपट !! जयदेव...
या आरतीच्या माध्यमातून उंदीर मामाच्या करामती आणि त्याचे गुणवान गायले जातात.
दशावताराच्या माध्यमातून जनमानसात प्रबोधन करणाऱ्या दशावतार भूत दयेचा प्रसार आणि प्रचार करताना गणपती सोबत असणाऱ्या त्याच्या वाहनाला सुध्दा तितकंच महत्त्व दिल्याचे दिसते. महाराष्ट्रात अनेक लोककला आज पाहायला मिळतात; पण दशावतार मात्र अनेक वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांसह पूर्ण वेगळाच. अगदी गणेशाच्या वाहन असणाऱ्या उंदीर मामासारखा नाना कथांनी युक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com