चिपळूण ः अपघात टाळण्यासाठी चिवेली फाट्यावर गतिरोधक बसवा

चिपळूण ः अपघात टाळण्यासाठी चिवेली फाट्यावर गतिरोधक बसवा

फोटो
- ratchl२७२.jpg ःKOP२३L९८८९३ चिपळूण ः राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना कुणबी युवा चिपळूणचे पदाधिकारी.

अपघात टाळण्यासाठी
चिवेली फाट्यावर गतिरोधक बसवा
कुणबी युवा चिपळूण ः राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी
चिपळूण, ता. २७ ः विजापूर-गुहागर महामार्गावरील उमरोली चिवेली फाटा येथे रस्ता रूंदीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहने अती वेगाने येतात. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चिवेलीफाटा येथील अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी कुणबी युवा चिपळूण संघटनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग चिपळूण विभागाकडे निवेदनद्वारे केली आहे.
गुहागर-विजापूर महामार्गावरील चिवेलीफाटा या ठिकाणी रस्ता रूंदीकरण झाल्यानंतर अपघातांची संख्या वाढली आहे. चिवेलीफाटा येथे सुमारे १० गावातील नागरिक विविध कामांसाठी आणि विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. हे ठिकाण नेहमीच गजबजलेले असते; मात्र या महामार्गाचे रूंदीकरण झाल्यानंतर या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महिन्यातून दोन ते तीन अपघात होतात. या घटनेची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे लक्ष द्यावे. चिवेलीफाटा येथे दोन्ही बाजूला गतीरोधक बसवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याच महामार्गावर उमरोली गायकरवाडी बसथांब्याशेजारी एक धोकादायक वळण आहे. तेथील रस्ता पूर्णतः खराब झाला आहे. तरी तो रस्ता लवकरच सुस्थितीत करावा. या वळणावर होणारे अपघातांचे प्रमाणसुद्धा कसे टाळता येतील याकडेसुद्धा लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
कुणबी युवाच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ही संघटना नेहमीच पुढाकार घेत असते. निवेदन देताना चिपळूणचे कुणबी युवा तालुकाध्यक्ष संतोष कुळे, प्रभारी सचिव कल्पेश बाईत, संघटक भरत धुलप, नितेश खाडे, नितेश दुर्गोळी व पदाधिकारी यांनी गुरूवारी उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग चिपळूण यांना निवेदन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com