Nitesh Rane
Nitesh RaneSakal

Nitesh Rane : ...तर ठाकरे कुटुंबियांची गुपितं बाहेर काढू

यापुढं भाजप नेत्‍यांवर टीका कराल तर ठाकरे कुटुंबियांची गुपितं बाहेर काढू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना दिला.
Summary

यापुढं भाजप नेत्‍यांवर टीका कराल तर ठाकरे कुटुंबियांची गुपितं बाहेर काढू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना दिला.

कणकवली - यापुढं भाजप नेत्‍यांवर टीका कराल तर ठाकरे कुटुंबियांची गुपितं बाहेर काढू, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना दिला. यापुढे राऊतांच्या प्रत्‍येक टीकेला आपण प्रत्‍युत्तर देणार आहोत. त्‍यामुळे यापुढे ठाकरेंची बदनामी करायची की नाही हे राऊत यांनी ठरवावं असंही राणे म्‍हणाले.

आमदार नीतेश राणे यांनी कणकवली पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, यापुढे संजय राऊत यांनी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याबद्दल बेताल वक्तव्य केले, अपशब्द बोलले तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे कपडे मी टराटरा फाडणार आहे. त्‍यांची सर्व गुपितं मी बाहेर काढणार आहे. त्‍यामुळे ठाकरेंची इज्जत किती ठेवावी हे संजय राऊत यांनीच आता ठरवावं.

राणे म्‍हणाले, राऊत हे सातत्‍याने भाजप नेत्‍यांवर भ्रष्‍टाचाराचे आरोप करत आहेत. पण भ्रष्टाचाराचा आरोप उद्धव ठाकरेंवर सुद्धा झालेला आहे. तसेच खुनाचा आरोप आदित्य ठाकरेंवर सुद्धा झालेला आहे. नंदकिशोर चतुर्वेदी, पाटणकर हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आहेत. त्‍यामुळे राऊत यांनी भाजप नेत्‍यांवर विनाकारण भ्रष्‍टाचाराचे आरोप करण्यापेक्षा त्‍यांनी भ्रष्‍टाचाराविरोधात न्यायालयात दाद मागायला हवी.

आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे. आम्हाला कोणाची भीती वाटत नाही, असेही आमदार राणे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com