कणकवली : निविदा

कणकवली : निविदा

कणकवली बांधकाम विभाग निविदा जाहीर
कणकवली ः सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध रस्त्यांच्या विकास कामांची निविदा जाहीर केली आहे. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन मालवण इमारतीच्या आवारातील मुलांची वस्तीगृह व इमारतीच्या प्रसाधन गृह दुरुस्ती आणि रंगरंगोटी साठी ९९ लाख १८ हजार ७९९ रुपये निधी तरतूद केली आहे. कुडाळ तालुक्यातील विठ्ठल मंदिर ते घोडके मळेवाडी येथे साकव बांधणे ४२ लाख २३ हजार ४०२ रुपये निधी मंजूर केला आहे. मान्यताप्राप्त ठेकेदारांना ऑनलाईन ई- निविदा १२ मे पर्यंत डाऊनलोड करावयाची आहे. निविदासंचाची फी, निवेदन सुरक्षा अनामत सीलबंद लखोटयामध्ये १५ मे पर्यंत सादर करावयाची आहे.

घोणसरी ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवली ः तालुक्यातील घोणसरी ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामांची निविदा जाहीर केली आहे. घोणसरी आंबेडकरनगर यशवंत जाधव घर ते मुख्य रस्त्यापर्यंत पाण्याचा निचरा करण्यासाठी गटार बांधकाम करणे ७ लाख ८१ हजार रुपये निधी तरतूद आहे. गावातील चर्च स्मशानभूमीला कंपाऊंड बांधणे एक लाख १८ हजार ७२५ रुपये, स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता तयार करणे २ लाख ८ हजार रुपये निधी मंजूर आहे. वरील कामाच्या कोऱ्या निविदा ग्रामपंचायत कार्यालयात ३ मे पर्यंत उपलब्ध असतील. मान्यताप्राप्त ठेकेदाराने अटी शर्तींसह ग्रामपंचायत कार्यालयाकडे निविदा सादर करावयाची आहे.

माड्याचीवाडी ग्रामपंचायत निविदा
कणकवली ः कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी ग्रामपंचायतच्या वतीने विकास कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त मक्तेदाराने सीलबंद निविदा ४ मे पर्यंत सादर करावयाची आहे. प्राप्त झालेली निविदा त्याच दिवशी उघडण्यात येणार आहे. माड्याचीवाडी करमळगाळू येथे स्ट्रीट लाईट ओढणे ९३ हजार ३८ रुपये निधी तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत स्टेशनरी साहित्य व टीसीएल खरेदीसाठी साहित्य पुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. कामाच्या अटी शर्तीची माहिती ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर लावल्याचे सरपंच ग्रामपंचायत माड्याचीवाडी यांनी कळविले आहे.

फोंडाघाट विकास निविदा जाहीर
कणकवली ः तालुक्यातील फोंडाघाट ग्रामपंचायतच्या वतीने विविध कामांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये फोंडाघाट पूर्ण प्राथमिक शाळा सुतारवाडी येथे शौचालय बांधणे ९९ हजार ८७५, गांगोवाडी ते गुरववाडी जाणाऱ्या रस्त्यालगत रुपेश चव्हाण यांचे घरापासून दीपक चव्हाण यांचे घरापर्यंत पायवाट करणे ४९ हजार ७३७ रुपये, बोकलबाटले ते विठ्ठल खरात यांच्या घरापर्यंत जाणारी पायवाट ९९ हजार ९७४ रुपये, दक्षिण बाजार सार्वजनिक विहिर कोथिंबिरे घर ते रेडेकर घरापर्यंत गटार बांधणे ९९ हजार ७१९ रुपये निधी मंजूर आहे. मान्यताप्राप्त ठेकेदारांना २ मे पर्यंत कोऱ्या निविदा फॉर्म उपलब्ध असून बयाणा रक्कम २ मे पर्यंत भरणा करावयाची आहे. सीलबंद निविदा ३ मे रोजी पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत असे सरपंच यांनी कळवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com