नेरुर प्रभाग भवनासाठी निधी देणार

नेरुर प्रभाग भवनासाठी निधी देणार

swt२७२१.jpg
९९००९
नेरुरः उमेद अंतर्गत संगम प्रभागसंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्धाटन करताना आमदार वैभव नाईक. यावेळी संजय पडते, भक्ती घाडी, सोनाली चव्हाण, स्वरा नेरुरकर आदी. (छायाचित्रः अजय सावंत)

नेरुर प्रभाग भवनासाठी निधी देणार
आमदार वैभव नाईकः संगम प्रभाग संघाची सभा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २७ः नेरूर प्रभाग संघाने आपले स्वतःचे भवन व्हावे, यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. यासाठी मी १५ लाखाचा निधी दिला आहे. उर्वरित निधी लवकरच दिला जाईल. जिल्ह्यात प्रभागसंघाचे कार्य चांगले असून या संघासाठी लागेल ते सहकार्य करू, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी आज केले.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत संगम प्रभागसंघ नेरुर-देऊळवाडा यांच्यावतीने संगम प्रभागसंघाची वार्षिक सभा व इतर कार्यक्रम सुखकर्ता हॉल नेरुर-चव्हाटा येथे झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सरपंच भक्ती घाडी, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड, भास्कर गावडे, श्री. कदम, प्रभागसंघ अध्यक्ष सोनाली चव्हाण,
सचिव स्वरा नेरुरकर, कोषाध्यक्ष पुष्पलता म्हाडदळकर, माजी अध्यक्ष शामल प्रभू, अनन्या हडकर, रुपेश पावसकर, बबन बोभाटे, ग्रामसेवक सतीश साळगाकर, नेरूर ग्रामपंचायत सदस्य निकिती सडवेलकर, पूजा लिंगे, अनुजा नेरुरकर, रोशनी नाईक, रुचा पावसकर, सुचित्रा नेरुरकर, मंजुनाथ फडके, कवठी सरपंच स्वाती करलकर, विजयश्री मेस्त्री, उषा नेरुरकर, नितीन जावळे, रसिका राणे, प्रभागबंध समन्वयक प्राजक्ता नाईक-केरकर, सुप्रिया वालावलकर आदींसह नेरुर, कवठी, वालावल, चेंदवण, हुमरमळा, सरंबळ गावातील सरपंच नेरुर जिल्हा परिषद मतदार संघातील प्रभागसंघ कार्यकारिणी मंडळ, लेखापाल, सर्व सीआरपी व बचतगटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘प्रभागसंघ नेरुरच्या माध्यमातून चांगले कार्य सुरू आहे. त्यामुळेच वार्षिक सर्वसाधारण सभेस मोठ्या संख्येने गर्दी झाली. महिलांना व्यासपीठ मिळाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही घेतलेल्या सर्व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य राहील. महिलांनी उत्पादन घेतलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करू.’’
बीडीओ चव्हाण म्हणाले, ‘‘ नेरुर प्रभागाने विविध उपक्रम राबविले असून त्याची दखल जिल्ह्यातील प्रभाग घेत आहेत. विकासात्मक वाटचाल करताना एकजूट महत्त्वाची आहे. ती आज या मेळाव्यातून दिसून आली. श्री. राठोड यांनी खासगी कर्ज घेण्यापेक्षा बँकांच्या कर्जांना प्राधान्य देऊन व्यवसायातून प्रगती करा.’’
निवेदन अनन्या हडकर यांनी केले. अहवाल वाचन स्वरा नेरुरकर यांनी केले. आभार सोनाली चव्हाण यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com