सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळीचा शिडकावा

सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळीचा शिडकावा

सिंधुदुर्गात पुन्हा
अवकाळीचा शिडकावा
सावट कायम ः ढगाळ वातावरण
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २७ ः जिल्ह्याच्या काही भागात काल (ता. 26) रात्री उशिरा शिडकावा झाला. आज दिवसभर ढगाळ वातावरण असून पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस झाला. सहा ते सात दिवस जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. पूर्वपट्ट्यात तर पावसाने हाहाकार माजविला. त्यामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अवकाळीचा अंदाज दिला आहे. काल रात्री काही भागात शिडकावा झाला, तर आज सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण आहे. शुक्रवार, शनिवारी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. या पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये धास्तीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com