माणगाव बाजारपेठ-दत्तमंदिर
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

माणगाव बाजारपेठ-दत्तमंदिर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

99114
माणगाव ः श्री दत्तमंदिर येथे आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

माणगाव बाजारपेठ-दत्तमंदिर
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

२० लाख मंजूर; आमदार नाईकांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः आमदार वैभव नाईक यांनी माणगाव बाजारपेठ ते दत्तमंदिर जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणासाठी २० लाख रुपये निधी मंजूर केला असून या कामाचे भूमिपूजन आमदार नाईक यांच्या उपस्थितीत श्री दत्तमंदिर विश्वस्त कमिटीचे दीपक सादले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याआधी माणगाव दत्तमंदिर रस्त्यावरील नवीन पूलासाठी त्यांनी ७१ लाख निधी मंजूर केला आहे.
दत्तमंदिर रस्ता रुंदीकरण व पूल ही कामे प्रलंबित असल्याने या कामांच्या पूर्ततेसाठी श्री दत्तमंदिर विश्वस्त कमिटीने आमदार नाईक यांच्याकडे मागणी केली होती. आमदार नाईक यांनी ही दोन्ही कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली. त्यानुसार दोन्ही कामासाठी निधी मंजूर करून आता कामे प्रत्यक्षात सुरू केली आहेत. पूर्ण केल्याबद्दल दीपक सादले यांनी आमदार नाईक यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका संघटक बबन बोभाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, विभागप्रमुख बंड्या कुडतरकर, विभाग संघटक कौशल जोशी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, स्वप्नील शिंदे, माणगाव सरपंच मनीषा भोसले, उपसरपंच बापू बागवे, ग्रामपंचायत सदस्य अवधूत गायचोर, काजल नाईक, संजय धुरी, नामदेव धुरी, उपविभाग प्रमुख एकनाथ धुरी, रुपेश धारगळकर, ज्ञानेश्वर कुडतरकर, श्री. राऊळ आदींसह माणगाववासीय उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com