देवरूखच्या प्रा. पाटीलना आदर्श शिक्षक पुरस्कार

देवरूखच्या प्रा. पाटीलना आदर्श शिक्षक पुरस्कार

११ (टुडे ३ साठी, सेकंड मेन)

- rat२८p१.jpg ः
९९०८४
साडवली ः ग्लोबल फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. डॉ. लाल यांच्याकडून स्वीकारताना उपप्राचार्य डॉ. पाटील, इतर मान्यवर व कुटुंबीय.

देवरूखच्या प्रा. पाटील यांना पुरस्कार

आंतरराष्ट्रीय परिषदेत सन्मान ः ग्लोबल फाउंडेशनचा कार्यंक्रम

साडवली, ता. २८ ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सपे-पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांना ग्लोबल फाउंडेशनमार्फत मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे पार पडलेल्या ‘सार्क देशांमधील शाश्वत विकासाची उद्दिष्टे, समस्या, संधी आणि अडथळे’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार श्रीलंकेतील केलान विद्यापिठातील भूगोलशास्त्राचे वरिष्ठ प्रा. डॉ. लाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
डॉ. पाटील ७ जानेवारी २००९ ला आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रूजू झाले. ७ जानेवारी २०२२ पासून ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत शैक्षणिक, सामाजिक, संशोधन आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये अनमोल योगदान दिले आहे. त्याचीच पोचपावती म्हणून डॉ. पाटील यांना महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेमार्फत २०१५ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांनी सेवेत रूजू झाल्यानंतर २०१० ला शिवाजी विद्यापिठाची विद्यावाचस्पती पदवी मिळवली. २०१७ मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाले तर २०२० मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाचा जिओ इन्फॉर्मेटिक्स क्षेत्रातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम उच्च दर्जासह पूर्ण केला.
राष्ट्रीय दूर संवेदन संस्था देहराडून या संस्थेचा जिओ इन्फॉर्मेटिक्स फॉर अर्बन प्लॅनिंग हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम २०१५ ला भारतीय अंतराळ संशोधन संस्था बेंगलोर यांच्या अनुदानातून पूर्ण केला आहे. याशिवाय दूर संवेदन, भौगोलिक माहिती, जागतिक स्थान निश्चिती प्रणाली या तंत्रज्ञानाशी संबंधित त्यांनी ८ अभ्यासक्रम उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीच्या कालावधीत पूर्ण केले आहेत. डॉ. पाटील यांनी मुंबई विद्यापिठाच्या अभ्यासक्रम बदलांमध्येदेखील महत्वाचे योगदान दिले आहे. कोकणामध्ये जिओ इन्फॉर्मेटिक्स या क्षेत्रात काम करणारे एक प्रमुख प्राध्यापक म्हणून सरदार पाटील यांची ओळख आहे. डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सद्यःस्थितीत सहा विद्यार्थी पीएचडीसाठी संशोधन करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या व मुंबई विद्यापिठाच्यावतीने विविध महत्वाच्या समित्यांवर डॉ. पाटील कार्यरत आहेत.

----

आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी

संशोधन क्षेत्रांमध्ये डॉ. पाटील यांचे २३ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण ४ संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून, त्यांची एकूण ३ पुस्तके आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण ४३ व्याख्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये दिली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com