जिल्ह्यात ३०० जणांना खेळाचे धडे

जिल्ह्यात ३०० जणांना खेळाचे धडे

99178
मालवण ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले.


जिल्ह्यात ३०० जणांना खेळाचे धडे

कौशल्य विकास प्रशिक्षण; क्रीडा विभागाचा पुढाकार

मालवण, ता. २८ : शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या विविध खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास उन्हाळी प्रशिक्षण शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात जिल्ह्यातील ३०० खेळाडूंनी विविध खेळांचे धडे गिरवले.
खेळाच्या प्रसार व प्रसार केवळ खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळीपासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी ८ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तर खेळनिहाय व शारीरिक क्षमता खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात आले. या शिबिरात विविध खेळांच्या प्रशिक्षणामध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मल्लखांब व बास्केटबॉल या खेळाचे प्रशिक्षण शिबिर जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. हे शिबिर सिंधुदुर्ग जिल्हा मल्लखांब असोसिएशन व बास्केटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने शांताराम जोशी, रणवीर सावंत, दिनेश चव्हाण यांनी घेतले. बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे खजिनदार एकनाथ चव्हाण, स्वप्निल चव्हाण, महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष भरत वावळ यांनी घेतले. कबड्डी या खेळाचे प्रशिक्षण राष्ट्रीय खेळाडू श्रीमती अलेक्सा अल्मेडा यांनी जिमखाना स्टेडियम नगरपरिषद सावंतवाडी येथे घेतले. वेटलिफ्टिंग खेळाचे प्रशिक्षण तालुका क्रीडा अधिकारी वेंगुर्ला विजय शिंदे, संजय पेंडुरकर यांनी वराडकर हायस्कूल कट्टा येथे घेतले. बुद्धिबळ खेळाचे प्रशिक्षण श्री चेस ॲकॅडमी कणकवलीच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण आडेलकर यांनी ऑनलाइन दिले. कॅरम या खेळाचे प्रशिक्षण सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे राष्ट्रीय पंच व सचिव योगेश फणसळकर तसेच त्यांचे सहकारी प्रतीक बांदेकर, रोहन राजाध्यक्ष व राजेश निर्गुण यांनी श्री पंचम केमराज हायस्कूल सावंतवाडी या ठिकाणी घेतले.
----
इतर खेळांची प्रशिक्षणे
कराटे या खेळाचे प्रशिक्षण कासार्डे हायस्कूल कणकवली येथे राष्ट्रीय प्रशिक्षक राजेश खाडे, सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव दत्तात्रय मारकड यांनी घेतले. अथलेटिक्स खेळाचे प्रशिक्षण ताराचंद पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील जिल्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आले. उन्हाळी प्रशिक्षण शिबिर जिल्ह्यात क्रीडा परिषदेचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी के. मंजू लक्ष्मी व जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, शाम देशपांडे, विजय शिंदे, मनीषा पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात घेण्यात आले. याला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com