क्राईम एकत्रित

क्राईम एकत्रित

.१४ (पान ३ साठी)

दुचाकी-ट्रकच्या अपघातात महिलेचा मृत्यू

राजापूर ः दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. स्वाराविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश धोंडू गुरव (वय ३६) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) ला घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गणेश गुरव हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन ओणी ते पाचलच्या दिशेने निघाले होता. त्या वेळी त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागे मिनाक्षी कलमस्टे या बसल्या होत्या. दुचाकी येळवण येथील बागवेवाडी एसटी स्टॉपच्या येथे आली असता दुचाकी आणि पाचलकडून सौंदळकडे जाणारा ट्रक यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. त्यामध्ये दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसलेल्या मिनाक्षी कलमस्टे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गणेश गुरव याला गंभीर दुखापत झाली. त्याला रायपाटण ग्रामीण रुग्णालयातून रत्नागिरी शासकीय रुग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
-------
अपघातात देवरुख येथील तरुणाचा मृत्यू

साडवली ः देवरूख-रत्नागिरी मार्गावर दुचाकीचे नियंत्रण सुटून स्वाराचा अपघात झाला. या अपघातात देवरुख येथील तरुणाचे जागीच मृत्यू झाला. अक्षय सीताराम साळवी (वय २६, रा. देवरुख मधलीआळी ता. संगमेश्वर) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २८) सकाळी सोडदहाच्या सुमारास घडली. अक्षय दुचाकी घेऊन सकाळी निवळीकडे जात होता. वायंगणे येथील वळणावरून जात असताना दुचाकीवरील अक्षयचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी बाजूला जाऊन आदळली. यात अक्षयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अक्षयला तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अक्षयला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून अक्षयचा मृतदेह सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
--

बारशाच्याच दिवशीच बाळाच्या चेन लांबवल्या

रत्नागिरी ः मुलाच्या बारशाच्या दिवशी बाळाच्या गळ्यातील दोन सोन्याच्या चेन अज्ञात चोरट्याने लांबवल्या. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) रात्री साडेआठ ते नऊ या कालावधीत खालची आळी येथील भागीरथी भुवन येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी खालची आळी येथील भागीरथी भुवन जी. विंग रूम नं. ६ येथे मुलाचं बारस होतं. बाळाच्या गळ्यात दोन सोन्याच्या चेन घालण्यात आल्या होत्या. रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बाळाच्या गळ्यातील त्या दोन चेन लांबवल्या. या प्रकऱणी गुरूवारी (ता. २७) ला शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
-------
दुचाकीची पादचाऱ्याला धडक

रत्नागिरी ः शहरातील शांतीनगर येथील रस्त्यावर तरुणाला ठोकर देणाऱ्या स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत दत्तात्रय लिंगायत (वय २९, कसबा, हरचेरी-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. १८) दुपारी अडीचच्या सुमारास नाचणे- शांतीनगर रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी सार्थक मजगांवकर हा बसने शांतीनगर बस स्टॉप येथून घरी जात असताना दुचाकीवरील संशयित लिंगायत याने पाठीमागून येऊन धडक दिली. यामध्ये सार्थकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी गुरूवारी (ता. २७) शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
-
जयगड येथील तरुणीची आत्महत्या

रत्नागिरी ः तालुक्यातील बौद्धवाडी-जयगड येथे तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रुती प्रशांत मोहिते (वय २१) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) दुपारी पावणेबाराच्या सुमारास निदर्शनास आली. याबाबत तिच्या नातेवाइकांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली. श्रुतीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नसून या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com