विविध पुस्तकांच्या प्रदर्शनाला
कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

विविध पुस्तकांच्या प्रदर्शनाला कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

99519
कणकवली ः येथील नगर वाचनालयातर्फे पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. (छायाचित्र ः अनिकेत उचले)


विविध पुस्तकांच्या प्रदर्शनाला
कणकवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य

कणकवली,ता. ३० ः जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून येथील नगरवाचनालयात स्पर्धा परीक्षांसंदर्भातील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाला निवृत्त अधिकारी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाचनप्रेमींनी भेट दिली. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन निवृत्त अभियंता ललितकुमार माळवदे व लिलितागौरी माळवदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरवाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, कार्यकारिणी सदस्य वैजयंती करंदीकर, एचडीएफसी बँकेचे कर्मचारी सिद्धेश रांजणेकर, लक्ष्मण पाटील, लिपीक राजन ठाकूर, सौ. माणगावकर यांच्यासह नगरवाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
शासनाकडून नगरवाचनालयांमध्ये पुस्तके ठेवण्यासाठी निधी देण्यात आला आहे. याअंतर्गत कणकवली तालुका स्तरावरील अ - श्रेणीतील नगरवाचनालयाला अडीच लाखांची पुस्तके प्राप्त झाली आहेत. त्यासाठी वेगळे दालनही तयार केले जाणार आहे. दरम्यान, पुस्तक प्रदर्शनास निवृत्त अधिकारी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाचनप्रेमींनी भेट दिली. वाचनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com