विविध विकासकामांचे तेंडोलीत भूमिपूजन

विविध विकासकामांचे तेंडोलीत भूमिपूजन

swt३०१.jpg
९९५५६
तेंडोलीः नळपाणी योजना कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पार पडले.

विविध विकासकामांचे तेंडोलीत भूमिपूजन
कुडाळः आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून तेंडोली गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजनेसाठी दोन कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तेंडोली मारुती मंदिर मार्गे खरावतेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ लाख रुपये मंजूर केले असून या विकासकामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले. यावेळी तेंडोली विभागप्रमुख संदेश प्रभू, तेंडोली सरपंच अनघा तेंडोलकर, विजय प्रभू, आकाश मुननकर, साक्षी राऊळ, मंगेश प्रभू, कौशल राऊळ, सायली नार्वेकर, उत्कर्ष प्रभू, सुवर्णा तेंडुलकर, संदीप राऊळ, विशाखा चव्हाण, रामचंद्र राऊळ, नीलेश सर्वेकर आदींसह तेंडोली ग्रामस्थ उपस्थित होते.
.................
डिगसला आज वर्धापन सोहळा
कुडाळः डिगस-सुर्वेवाडी येथील श्री भवानी माता मंदिर येथे वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. १) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जयभवानी उत्कर्ष मंडळ, मुंबई व जय भवानी प्रासादिक भजन मंडळ, डिगस (सुर्वेवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ९ वाजती श्रींची महापूजा, ११ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता लहान मुलांचे कार्यक्रम, ७.३० वाजता स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्री ८.३० वाजता नाईक दशावतार नाट्यमंडळ (झरेबांबर दोडामार्ग) यांचा ''कुंडभैरव'' हा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन जयभवानी उत्कर्ष मंडळ, मुंबई व जय भवानी प्रासादिक भजन मंडळ, डिगस (सुर्वेवाडी) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
.............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com