लोकअदालतीत १२३ प्रकरणांचा निपटारा

लोकअदालतीत १२३ प्रकरणांचा निपटारा

99623
सावंतवाडी ः राष्ट्रीय लोकअदालत उद्घाटन प्रसंगी दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर व अन्य.

लोकअदालतीत १२३ प्रकरणांचा निपटारा

सावंतवाडीत उपक्रम; एकूण १४,२२,७८२ रुपयांची वसुली

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः तालुका विधी सेवा समिती व वकिल संघटना यांच्या सयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी एकूण ११८९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण १२३ प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. त्यातून १४ लाख २२ हजार ७८२ रुपयांची वसुली करण्यात आली.
सावंतवाडी न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश आर. आर. बेडगकर, सहदिवाणी न्यायाधीश डी. बी. सुतार यांच्या उपस्थितीत ही राष्ट्रीय लोकअदालत झाली. यावेळी सावंतवाडी वकिल संघटनेच्या अध्यक्षा अॅड. नीता सावंत-कविटकर, पॅनेल समिती सदस्य अॅड. जी. जी. बांदेकर उपस्थित होते.
लोकलोकन्यायालयात वादपूर्व प्रकरणे ६९१ ठेवण्यात आली. त्यापैकी ८२ प्रकरणे निकाली होऊन ४ लाख ८६ हजार ९४१ रुपये रक्कम वसूल झाली. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ४९८ ठेवण्यात आली. त्यापैकी ४१ प्रकरणे निकाली होऊन ९ लाख ३५ हजार ८४१ रुपये रक्कम वसूल झाली. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे सहायक अधीक्षक एन. एस. सावंत, एस. एस. सबनीस, तालुका विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ लिपीक श्रीमती. व्ही. एम. मीर आदी न्यायालयीन कर्मचारी व पोलिस उपस्थित होते.
................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com