शाहू महाराजांचे कार्य दिशा देणारे

शाहू महाराजांचे कार्य दिशा देणारे

swt3019.jpg
99678
कुडाळः सामाजिक न्याय व सलोखा परिषद कार्यक्रमात बोलताना डॉ. भारत पाटणकर. व्यासपिठावर अॅड. सुहास सावंत, कमल परुळेकर, सुरेखा दळवी, हुमायून मुरसल, संजय मंगला गोपाळ व अन्य.

शाहू महाराजांचे कार्य दिशा देणारे
डॉ. भारत पाटणकरः शताब्दीनिमित्त कुडाळात सलोखा परिषद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३०ः राजर्षी शाहू महाराज यांनी गोरगरीबांसाठी शिक्षण, नोकऱ्यांची दारे खुली केली. शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी पाहिलेले सामाजिक न्यायाचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहे. त्यासाठी घटनेने दिलेले स्वातंत्र्य जपण्याचे काम प्रत्येकाने केले पाहीजे. संविधान अबाधित राहिले पाहिजे, यासाठी प्रत्येकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती व त्यांचे कार्य समाजाला समजले पाहीजे, यासाठी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त राज्यभर अशा सामाजिक न्याय व सलोखा परिषदांचे आयोजन केले जात आहे. शाहू महाराज यांचे कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यांचे विचार, त्यांचा आदर्शवत इतिहास सध्याच्या तरूण पिढीसमोर आणा, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी येथे केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त एस. एस. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र, यांसह विविध संघटनांच्यावतीने आज येथील मराठा समाज हॉलच्या सभागृहात सामाजिक न्याय व सलोखा परिषदचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कमलताई परूळेकर, प्रमुख मार्गदर्शक संजय मंगला गोपाळ, हुमायून मुरसल, युयुत्स आर्ते, अॅड. सुहास सावंत, प्रसाद कुडाळकर, मुश्ताक शेख, रफीक मेमन, डॉ. श्रीकांत सावंत, सतीश लळीत, सुरेखा दळवी आदी उपस्थित होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कुडाळ येथे ही सामाजिक न्याय व सलोखा परिषद होत आहे, हे अभिमानास्पद आहे. आज समाजामध्ये जाती व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर भेदभाव केला जात आहे. सध्याची जातीय व्यवस्था समूळ नष्ट करणे, हाच खरा सामाजिक न्याय आहे. सध्याच्या हुकूमशाहीला संपवायचे असेल तर सामाजिक न्याय व सलोखा परिषद महत्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी हातात हात घेऊन एकत्र येण्याची गरज आहे. जातीय व्यवस्थेचा अंत होणे हा सामाजिक न्याय आहे. सर्वानी एकसंघ झाले पाहीजे. स्त्रीयांना स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यांना समाजात योग्य मान सन्मान मिळाला पाहीजे. आज भांडवलदार एकमेकांना मागे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधी डगमगले नाहीत. त्यांचा इतिहास वाचा वाचा. धर्माच्या आधारावर प्रबोधन करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपल्याला संविधानीक स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याचा वापर करा. सामाजिक न्यायासोबतच सर्वांमध्ये सलोखा निर्माण करायचा आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.’’
श्री. गोपाळ यांनी राजर्षी शाहू महाराजांनी वयाच्या ४८ वर्षांत मोठा इतिहास घडविला, असे सांगून त्यांचे कार्य उलगडले. अध्यक्षस्थानावरून बोलताना कमलताई परुळेकर यांनी राजर्षी शाहू महाराज हे लोकराजा होते. अशा लोकप्रिय राजांचे चालू वर्ष राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दी स्मृती वर्ष म्हणून राज्यभर साजरे करण्यात येत आहे. नव्या पिढीला छत्रपती शाहू महाराजांचे कार्य कळावे म्हणून हि परिषद घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. या परिषदेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट
सत्कार समारंभ
एस.एम. जोशी सोशलीस्ट फाऊंडेशनच्यावतीने यावेळी महेंद्र मोहन (ओणी - रत्नागिरी), काका जोशी (साखरपा - रत्नागिरी), दीपक भोगटे (कट्टा-मालवण), स्वाती पेडणेकर (कुडाळ), इर्शाद शेख (वेंगुर्ले), नितीन वाळके (मालवण), एजाज नाईक (कुडाळ), मोहन जाधव  (शेर्ले - सावंतवाडी), डॉ. श्रीकांत सावंत (कुडाळ), प्रा. प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com