शेट्ये यांचा सत्कार

शेट्ये यांचा सत्कार

१६ (टुडे पान ३ साठी)


-rat२p११.jpg-
९९९०६
रत्नागिरी ः मुख्याध्यापिका प्रमोदिनी शेट्ये यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करताना भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्ष नमिता कीर. सोबत पदाधिकारी, मान्यवर.
--

मुख्याध्यापिका प्रमोदिनी शेट्ये यांचा सत्कार

रत्नागिरी ः येथील गो. भ. बियाणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका प्रमोदिनी शेट्ये यांचा निवृत्तीनिमित्त भारत शिक्षण मंडळातर्फे सेवा गुणगौरव कृतज्ञता सोहळ्यात सत्कार करण्यात आला. या वेळी भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, कार्यवाह सुनील वणजू, सहकार्याध्यक्ष श्रीराम भावे, नचिकेत जोशी, संजय जोशी, शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत घवाळी, प्रबंधक विनायक हातखंबकर, संजय चव्हाण, राजेंद्र कदम, संतोष कुष्टे, सतीश दळी, कॅप्टन दिलीप भाटकर, स्वरुपानंद सेवा मंडळाचे सदस्य हेमंत गोडबोले, ओंकार शेट्ये, राजेश गांगण, प्रभाकर गांगण आदी उपस्थित होते.
प्रमोदिनी शेट्ये यांनी बियाणी बालमंदिरमध्ये १९९५ पासून कार्यरत असून २३ वर्षे शिक्षिका म्हणून काम पाहिले व गेली चार वर्षे मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. शिस्तप्रिय, प्रेमळ, हसतमुख व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी आदर्श विद्यार्थी घडवले असून ते डॉक्टर, अभियंता व मोठ्या पदांवर नोकरी करत आहेत. कार्यक्रमात माजी विद्यार्थी गुरूप्रसाद पटवर्धन, पूर्वा जोगळेकर, लिना चांदोरकर यांनी मनोगतातून बालपणीच्या आठवणी जागवल्या. शिक्षिका अपर्णा गोगटे, पालक प्रतिनिधी उमेश जोशी, कृ. चिं. आगाशे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, बंधू राजेश गांगण, बालमंदिरच्या सेविका सौ. आरती यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर करंदीकर यांनी ऑस्ट्रेलियातून व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रमात उपस्थिती लावली.
-

लांज्यात वहाळावरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन

लांजा ः गेल्या काही महिन्यांपासून धोकादायक बनलेल्या आणि सातत्याने छोटे-मोठे अपघात होत असलेल्या शहरातील भिंगार्डे घरासमोरील वहाळावरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्या हस्ते झाले. लांजा शहरातील प्रभाग क्र. १० ला जोडणाऱ्या आणि भिंगार्डे घरासमोरील वहाळावरील पूल हा गेल्या काही महिन्यांपासून धोकादायक बनला होता. याबाबत स्थानिक नगरसेवक मंगेश लांजेकर यांनी नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या; मात्र तरीदेखील याबाबत कोणत्या प्रकारची कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतरच नगरपंचायत पूल बांधणार का, असा सवाल लांजेकर यांनी उपस्थित केला होता. अखेर या वहाळावरील पुलाचे भूमिपूजन लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी लांजेकर यांच्यासह भाजपाचे लांजा शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, जिल्हा चिटणीस हेमंत शेट्ये, इकबाल गिरकर तसेच गुरूप्रसाद तेली, सुयोग तोडकरी, शेखर सावंत, विशू जेधे, प्रकाश लांजेकर, अन्य स्थानिक नागरिक उपस्थित होते.
--

फोटो ओळी
-rat२p८.jpg ः
९९९०७
रत्नागिरी ः वर्धापन दिनात वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे यांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
--
संस्कार नेहरू युवा मंडळाचा वर्धापन दिन

रत्नागिरी ः संस्कार नेहरू युवा मंडळ झरेवाडी या मंडळाचा १४वा वर्धापनदिन १ मे या स्थापना दिवशी उत्साहात झाला. वर्धापन दिनानिमित्त केंद्र शाळा झरेवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी केंद्रप्रमुख पवार, मुख्याध्यापिका बगाडे, शिक्षक, सरपंच गोताड, उपसरपंच देवेंद्र सनगरे, पोलिस पाटील बाळकृष्ण गोताड, माजी सरपंच चंद्रकांत गोताड, शालेय व्यवस्थान कमिटीचे विनोद गोताड आणि गावातील ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. या वेळी केंद्रशाळा झरेवाडीतर्फे मंडळाला शुभेच्छा देण्यात आल्या तसेच मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोरे यांचा मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला तसेच चांदेराई आरोग्य केंद्रातील रुग्णांना मंडळाच्यावतीने फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष ॲड. अवधूत कळंबटे, गणेश कळंबटे, प्रमुख मान्यवर चांदेराई स्थानिक ग्रामस्थ व नेते दादा दळी, उपसरपंच देवेंद्र सनगरे, दिनेश तांबे, विनोद गोताड, काशिनाथ कळंबटे, अनंत गोताड, रामचंद्र कळंबटे, प्रदीप सनगरे, संदीप कळंबटे, आणि मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com