कणकवली नगरपंचायत आदर्शवत

कणकवली नगरपंचायत आदर्शवत

99995
कणकवली : शहरातील इनडोअर क्रिकेट मैदानाचे उद्‌घाटन भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी केले. यावेळी आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)

कणकवली नगरपंचायत आदर्शवत

नीलेश राणे; शहरातील इनडोअर क्रिकेट मैदानाचे उद्‌घाटन

कणकवली, ता.२ : शहरात अद्ययावत क्रीडा संकुल उभे राहिले. त्‍यानंतर काही दिवसांतच इनडोअर क्रिकेट मैदानाचीही उभारणी करण्यात आली. लवकरच कृत्रिम धबधबाही उभा राहणार आहे. अवघ्या काही दिवसांत ही सर्व कामे उभी करणारी कणकवली नगरपंचायत ही राज्‍यासाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी केले.
महाराष्‍ट्र दिनाच्या औचित्‍यावर श्री.राणे यांनी शहरातील इनडोअर क्रिकेट मैदानाचे उद्‌घाटन केले. याप्रसंगी आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सरचिटणीस मनोज रावराणे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, बँक संचालिका प्रज्ञा ढवण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सरपंच संदीप सावंत, नगरसेवक अबिद नाईक, शिशिर परुळेकर, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, महेश सावंत, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.
--
चांगले खेळाडू घडतील
नीलेश राणे म्‍हणाले, ‘‘नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्‍यांची शहराच्या विकासात भरीव योगदान आहे. त्‍यामुळेच शहरवासीयांना वैविध्यपूर्ण उपक्रमांचा लाभ घेता येतो. आज उद्‌घाटन झालेल्‍या बॉक्स क्रिकेट स्टेडियममधून चांगले खेळाडू निर्माण होतील.
---
शहरातील जनता पाठीशी
आमदार नितेश राणे म्हणाले, या ठिकाणी युवकांना चांगले मैदान उपलब्ध करुन दिले आहे. त्याचे लोकार्पण आम्ही केले आहे. कणकवली येथील युवकांसाठी हे मैदान उपलब्ध केले आहे, त्यामुळे शहरातील जनता आमच्या पाठीशी राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com