संगमेश्वर बाजारात वाहतूक कोंडी

संगमेश्वर बाजारात वाहतूक कोंडी

२१ (पान २ साठी, संक्षिप्त)

संगमेश्वर बाजारातील वाहतूक कोंडी रोखा

संगमेश्वर ः संगमेश्वर बाजारपेठेत रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांमुळे तसेच फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होते. त्याचा पादचारी तसेच ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. संगमेश्वर पोलिसांनी याकडे लक्ष देऊन वाहतूककोंडी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. संगमेश्वर बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी खरेदीकरिता मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात. संगमेश्वर बाजारपेठ अरूंद बाजारपेठ आहे. अनेकवेळा दुकानासमोर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. तसेच फेरीवाले रस्त्यामध्येच गाड्या लावून माल विक्री करत असल्याचे अनेक वेळा दिसत असून त्याचा त्रास पादचारी तसेच ग्राहकांना सहन करावा लागतो. १० ते १५ मिनिटे वाहतूककोंडीत अडकून राहावे लागत असल्याने वाहचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देऊन वाहतूककोंडी करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच कायमस्वरूपी पोलिस देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
--

फोटो ओळी
-rat२p२३.jpg ः
९९९३१
साखरपा ः कौस्तुभ बने, पार्थ घोगरे, आधीश कबनूरकर.
--

शिष्यवृत्ती परीक्षेत कबनूरकर स्कूलचे यश

साखरपा ः शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात येथील कबनूरकर स्कूलने यश संपादन केले आहे. या शाळेचे आठ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. आठवीतील विद्यार्थी कौस्तुभ बने याने २१४ गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळाला. आठवीतील विद्यार्थी पार्थ घोगरे आणि आधीश कबनूरकर यांनी १८२ आणि १६८ गुण मिळवत द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. पाचवीतून प्रथम येण्याचा मान हर्षवर्धन पाटील याने १७६ गुणांसह पटकावला आहे. १६८ गुणांसह शौर्य भानुशाली याने द्वितीय तर १६६ गुणांसह गार्गी शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. यश कांबळे (१२८ गुण) आणि प्रशांत शेडे (१२२ गुण) यांनीही चौथा आणि पाचवा क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन श्रीधर कबनूरकर, मुख्याध्यापिका लिना कबनूरकर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्‍यांनी अभिनंदन केले आहे.
---

फोटो ओळी
-Rat२p२४.jpg ः
९९९३२
मंडणगड ः आपला दवाखाना उपक्रमावेळी उपस्थित आमदार योगेश कदम व अन्य मान्यवर.
--
मंडणगडमध्ये आपला दवाखाना सुरू

मंडणगड ः ग्रामीण भागातील नागरिक आरोग्यसेवेपासून वंचित राहू नयेत या उद्देशाने राज्यशासनाने हाती घेतेलेल्या हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाची सुरवात मंडणगड येथे करण्यात आली. सार्वजनिक आरोग्यसेवा देणारा आणखी एक दवाखाना मंडणगडमध्ये सुरू झाल्याने शहरासह तालुकावासीयांना ग्रामीण रुग्णालयासह आपला दवाखाना हा आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या हस्ते या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी सभापती भाई पोस्टुरे, आदेश केणे, अनंत लाखण, रामदास रेवाळे, तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मंडणगड नगरपंचायत कार्यक्षेत्रातील या दवाखान्याचे संचालन नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.
--

मंडणगडात प्रथमच शासकीय ध्वजारोहण

मंडणगड ः महाराष्ट्र राज्याच्या ६३ व्या स्थापनादिनानिमित्त १ मे रोजी दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदमांच्या हस्ते तहसील कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. १९६० ला मंडणगड तालुक्याची निर्मिती झाली. तहसील कार्यालयात आयोजित शासकीय कार्यक्रमास उपस्थित राहून आमदार कदम यांनी ध्वजारोहण केले. कार्यक्रमास उपस्थित तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला व संतांच्या आणि वीर पुरुषांच्या पवित्र विचारांनी व पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणानंतर तालुकावासीयांच्या उपस्थितीत तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते आमदारांचा सत्कार करण्यात आला.

----

पडवेतील ग्रामस्थांचा शिवसेनेला पाठिंबा

गुहागर ः गुहागर तालुक्यात विकासकामांना जनसुविधा योजनेच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांनी भरघोस निधी देत खऱ्या अर्थाने पालकत्व घेतल्याचे कृतीतून दाखवून दिल्यानंतर जिल्ह्याबरोबर गुहागर तालुक्यात शिवसेना पक्षात इन्कमिंग सुरू झाले आहे, असे चित्र पाहावयास मिळत आहे. नुकतेच पडवे मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी एकमताने पालकमंत्री सामंत व शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठाम असल्याचा शब्द दिला आहे. पडवे मोहल्ल्यातील विविध कामांची मागणी करत पाठिंबा दर्शवला. यात प्रामुख्याने पडवे प्रवाशी जेट्टी ते सईद राजपुरकर घरापर्यंत संरक्षक भिंत बांधणे, पडवे ग्रा. पं. माडातील प्रवाशी जेट्टी ते इब्राहिम खलेपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, दाऊद जांभारकर घर ते अफजल जांभारकर घरापर्यंत पेव्हरब्लॉक बसवणे, आफताब दाभोळकर घर ते राजापूरकर घरापर्यंत पेव्हरब्लॉक बसवणे, टेमकर कब्रस्तानला कंपाऊंड वॉल बांधणे इ. विकासकामांची मागणी करण्यात आली. गुहागर शिवसेना तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर यांच्या उपस्थितीत पडवे पाच मोहल्यातील ग्रामस्थांनी बैठक घेऊन आपल्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या विकासकामांच्या व्यथा मांडल्या. पडवे गावाचा विकास अनेकवर्षे मागे गेला. यामध्ये बदल व्हावा आणि तो शिवसेना पक्ष व पालकमंत्री सामंतच करू शकतात, असा विश्वास व्यक्त करत ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे. या वेळी कनगुटकर यांनी आपली विकासकामे लवकरच पालकमंत्री यांच्या माध्यमातून पूर्ण करू, असे आश्वासन दिले.

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com