चिपळूण येथे शनिवारपासून
‘सम्यक साहित्य कला संगीती’

चिपळूण येथे शनिवारपासून ‘सम्यक साहित्य कला संगीती’

चिपळूण येथे शनिवारपासून
‘सम्यक साहित्य कला संगीती’

सावंतवाडी, ता. ३ ः कोकणातील फुले, शाहू, आंबेडकरी व परिवर्तनवादी चळवळीतील साहित्यिक व कलावंतांना संघटित करून कोकणातील वाङमयीन व विविध कला स्वरुपातील चळवळींना बळकट करण्यासाठी पहिली ‘सम्यक साहित्य-कला संगीती’ (साहित्यिक-कलावंत मेळावा) ६ व ७ मे रोजी चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे आयोजित केली आहे.
या दोन दिवसीय संगीतीचे उद्‍घाटन ६ ला दुपारी तीनला ज्येष्ठ मराठी साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत, लेखक तथा दलित पॅंथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार यांच्या हस्ते होणार आहे. साहित्यिक विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर, ‘आयदान’कार लेखिका उर्मिला पवार, डॉ. श्रीधर पवार, प्रा. आशालता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक पवार, ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात विविध साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर पुस्तक प्रदर्शनाचे उद्‍घाटन केले जाणार आहे. ७ ला सकाळी नऊला ‘नियतकालिके व पुस्तके निर्मितीची प्रक्रिया, छपाई, वितरण व आव्हाने’, विषयावर चर्चासत्र होणार असून त्यात प्रा. आनंद देवडेकर, अनिल जाधव, जाधव, विजय जाधव, प्रदीप नाईक आपली भूमिका मांडणार आहेत. यासह ‘मी असा घडलो!’ मुलाखत कार्यक्रम, कवी संमेलन व सायंकाळी चारला संगीतीचा समारोप होणार आहे. कोकणातील साहित्यिक, रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून मेळाव्याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com