मासेमारी बंदी

मासेमारी बंदी

४ (टुडे पान १ साठी)

यांत्रिक नौकांना १ जूनपासून मासेमारी बंदी

मत्स्य व्यवसाय विभाग ः पावसाळ्याची तयारी

रत्नागिरी, ता. ३ ः महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार, १ जून ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत पावसाळ्यामध्ये राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिकी नौकांनी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत सागरी कायद्याचा भंग करून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे.
पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचालित व यांत्रिक मासेमारी गलबत यांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित गलबत यांना लागू राहणार नाही. सागरी जलधी क्षेत्राबाहेर म्हणजेच सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैल अंतराच्या पुढे खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतच्या मार्गदर्शक सूचना किंवा आदेश लागू राहतील. सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैल अंतरापर्यंत यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास नौका व नौकेवर बसवलेली उपसाधने, मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कठोर कारवाई केली जाईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना बंदी आहे. सर्व मच्छीमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक सभासद व अन्य संबंधितांनी या सूचनांची नोंद घेऊन बंदी कालावधीत यांत्रिकी नौकांद्वारे सागरात मासेमारी केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, रत्नागिरी कार्यालयाकडून सूचित करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com