चिपळुणात संरक्षण भिंत तोडून साहित्याची चोरी

चिपळुणात संरक्षण भिंत तोडून साहित्याची चोरी

३७ (पान ३ साठीमेन)

फोटो ओळी
-rat३p३५.jpg ः
२३M००३२८
चिपळूण ः बहादूरशेख नाका येथील याच जागेतील संरक्षण भिंतीचे बांधकाम तोडून साहित्य चोरीला गेले आहे.
---
संरक्षण भिंत तोडून साहित्याची चोरी

चिपळुणातील बहादूरशेख नाका येथील प्रकार ; तिघांवर गुन्हा दाखल

चिपळूण, ता. ३ ः शहरातील बहादूरशेख नाका येथील स्वमालकीच्या जमिनीला घातलेली संरक्षण भिंत तोडून ५५ हजार रुपयांच्या साहित्याची चोरी झाल्याचा प्रकार १ मे रोजी घडला. या प्रकरणी तिघांवर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबू सुर्वे, बनसोडे, रफिक अब्दुल लतीफ वांगडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबतची तक्रार अली महमद इब्राहिम वांगडे यांनी केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, बहादूरशेख मोहल्ला येथे आपली वडिलोपार्जित जमिन आहे. २८ एप्रिलला मी या जागेला संरक्षण भिंत बांधायची असल्याने स्थापत्य अभियंत्यांकडून १ लाख ५७ हजार रुपयाचे अंदाजपत्रक तयार करून त्यांना हे काम दिले. त्यानुसार त्यांनी डबर, जांभा, वाळू आदी साहित्य आणून ३० एप्रिलला काम सुरू केले; मात्र पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने आम्ही हे काम थांबवले. त्यामुळे आणलेले साहित्य तेथेच होते. असे असताना १ मे रोजी सायंकाळी ५ वा. मी माझा मुलगा अब्दुल वांगडे याला घेऊन सदर जागेत पाहिले असता संरक्षण भिंतीचे केलेले बांधकाम तोडलेले दिसले व त्यासाठी आणलेले साहित्य तेथे नव्हते असे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com