किर्लोसच्या विकासासाठी कटिबद्ध

किर्लोसच्या विकासासाठी कटिबद्ध

00347
किर्लोस ः येथील भावेवाडी प्राथमिक शाळेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रामाचा प्रारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. शेजारी साक्षी चव्हाण, अजित लाड, आत्माराम उर्फ दादा भावे आदी.


किर्लोसच्या विकासासाठी कटिबद्ध

आमदार वैभव नाईक; भावेवाडी शाळेचा अमृतमहोत्सवी सोहळा

कणकवली,ता. ३ ः शिक्षण हा समृद्धीचा मार्ग आहे. शिक्षणामुळे विकासाची गंगा आणणे शक्य होते. भावी पिढी शिक्षणाने समृद्ध घडविण्यासाठी ७५ वर्षांपूर्वी किर्लोस सारख्या गावात शाळेची मुहूर्तमेढ रोवत खऱ्या अर्थाने त्या काळातील पिढीने भावी पिढीसमोर आदर्श निर्माण केला. जि. प. प्राथमिक शाळा किर्लोस भावेवाडीचा हा अमृतमहोत्सवी सोहळा खऱ्या अर्थाने आदर्शवत ठरला आहे. यानिमित्ताने ग्रामस्थांनी जे एकीचे बळ दाखविले ते स्तुत्य आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले. किर्लोसच्या विकासाचे कोणतेही प्रश्न असोत, ते सोडविण्यासाठी कटिबद्ध असून भविष्यात हा परिसर सुजलाम सुफलाम व्हावा, यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे श्री. नाईक म्हणाले.
किर्लोस भावेवाडी (ता.मालवण) येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या अमृतमहोत्सवी समारंभात आमदार नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच साक्षी चव्हाण, उपसरपंच अजित लाड, केंद्रप्रमुख देऊ जंगले, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण घाडीगावकर, सामाजिक कार्यकर्ते बाबा सावंत, गोपी लाड, बंडू चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रद्धा चव्हाण, मुख्याध्यापिका शिवानी पाताडे, शिक्षिका मानसी राणे, माजी पोलिसपाटील प्रकाश भावे, ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत भावे, अनंत कदम, दीनानाथ भावे, दत्ताराम चव्हाण, सुरेश भावे, प्रताप भावे, शुभांगी सावंत, शशिकांत भावे, भास्कर मेस्त्री, वरवडे ग्रामपंचायत सदस्य मयुरी महेश मेस्त्री, आंबवणे शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेगाळ, किर्लोस गावठणवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल राणे, श्री. खाकर, ग्रामपंचायत सदस्य मानसी भावे, नूतन घाडीगावकर, गुरुनाथ चव्हाण, पोलिसपाटील किशोर लाड, श्री रामेश्वर सोसायटीचे चेअरमन स्वानंद भावे, माजी शिक्षक विजय जाधव, वर्षा विनोद परब, उमेश मोरे, अरुण भावे, सुनिल भावे आदी उपस्थित होते. यावेळी रामेश्वर मंदिर ते भावेवाडी शाळा अशी शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान, दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम झाले. समारोप समारंभाला माजी सभापती राजू परुळेकर, सरपंच साक्षी चव्हाण, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, पंच सदस्य प्रवीण घाडीगावकर आदी उपस्थित होते. यावेळी राजू परूळेकर यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. राजू परुळेकर म्हणाले, ‘‘शाळेचा अमृतमहोत्सवानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा केला जाणारा सत्कार आणि आठवण खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. शाळेच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू.’’ लक्ष्मीकांत भावे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका शिवानी पाताडे व स्वानंद भावे यांनी आभार मानले.
--
गावकऱ्यांचा आदर्श प्रेरणादायी
आमदार नाईक म्हणाले, ‘‘खऱ्या अर्थाने शाळेच्या स्मृती जोपासण्याचे काम येथील ग्रामस्थ करत आहेत. भविष्यात विविध सामाजिक उपक्रम राबवून शैक्षणिक विकासासाठी आवश्यक प्रयत्न करावेत, आमची निश्चितपणे साथ मिळेल. ज्या प्रतिकूल परिस्थितीत शाळेची स्थापना झाली. गावकऱ्यांनी शिक्षणाचे महत्व त्या काळात जाणले. तो आदर्श खरोखरच घेण्यासारखा आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com