महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे पुरस्कार जाहीर

३४ (पान २ साठी)

कामगार कल्याण मंडळाचे पुरस्कार जाहीर

५१ जणांची निवड ; पुरस्कार वितरण मुंबईत होणार

चिपळूण, ता. ४ ः महाराष्ट्र दिन व कामगारदिनाचे औचित्य साधत कामगार मंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्सचे पिंपरी पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. तसेच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात आली.
चिंचवड, पुणे येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याप्रसंगी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, आमदार अश्‍विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रवीराज इळवे, पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कोकण विभागाचे अप्पर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक एम. आर. पाटील, बाष्पके संचालनालयाचे संचालक डी. पी. अंतापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार जाहीर झालेले कामगार- कामगार भूषण पुरस्कार-मोहन गायकवाड, गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार - ललितादास देशपांडे, बजरंग साळुंखे, संगप्पा करोले, राजेंद्र पवार, विजयकुमार पांचाळ, प्रशांत भगत, आनंदा पाटील, अभय घरत, केशव मराठे, निर्मला देऊसकर, भारत शिंदे, रमेश शिंदे, प्रकाश हेडाऊ, श्रीराम कुलकर्णी, संजय गाढवे, नारायण धनगर, महादेव खोत, माधुरी कावरे, मधुकर सुरवाडे, सतीशकुमार कोरडे, दिगंबर शिंदे, नवनाथ बोडखे, संजय गुरव, राजेंद्र कोळी, प्रियदर्शनी भोसले, विश्‍वनाथ गवंडळकर, सदाशिव एकसंबे, प्रेमानंद गडपायले, श्रीकांत कदम, प्रवीण पाटील, अमोल पवार, मोहनदास चोरे, संदीप पोलकम, संदीप पिसाळ, विलास वडघुले, परेश पारेख, कैलास भोळे, शेख रशीद, प्रवीण वाघमारे, अनिल जाधव, राजेंद्र माने, हरिभाऊ तांबे, मनोहर ब्रीद, उमेश जाधव, प्रसन्न पारकर, दिगंबर भदाणे, शंकर मांढरे, प्रकाश कवडे, गणेश सुळे, प्रफुल्ल आवारे, संतराम जाधव यांचा समावेश आहे. रोख रक्कम ५० हजार रु., मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक असे कामगार भूषण पुरस्काराचे तर रोख रक्कम २५ हजार रु., मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक असे गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती कामगार कल्याण अधिकारी अरूण लाड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com