रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

००५३९

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडीत उपक्रम ः भंडारी समाज मंडळ, ‘सिंधू रक्तमित्र’चा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळ, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रक्तदान शिबिराचे उद्‍घाटन छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने माधवबाग संस्थेचे डॉ. अमेय पाटकर, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव किशोर नाचणोलकर, एसएसपीएम हॉस्पिटलचे डॉ. सूरज वानखेडे, कामगार कल्याण केंद्र, कुडाळ केंद्रप्रमुख सुश्मिता नाईक, विश्वविक्रमवीर शमिका चिपकर, भंडारी महिला मंडळाच्या अध्यक्षा शीतल नाईक, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सावंतवाडी-दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, मंडळाचे सचिव दिलीप पेडणेकर, मंडळाचे उपाध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, गुरुनाथ पेडणेकर, बाळा आकेरकर, देविदास आडारकर, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडीचे देव्या सूर्याजी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुका सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
रक्तदान शिबिरास सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना ‘थॅलिसेमिया’ या आजाराविषयी विस्तृत माहिती दिली. प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव किशोर नाचणोलकर यांनी ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ या दुर्मिळ रक्तगटाविषयी माहिती देताना जागतिक पातळीवर सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे या रक्तगटाच्या शोध मोहिमेतील कार्य सांगितले. जगात या रक्तगटाच्या केवळ ४५० च्या आसपास व्यक्ती असून त्यांपैकी १९ व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याचे सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या शोध मोहिमेमुळे शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाचणोलकर यांनी तालुका भंडारी मंडळाच्या समाजाभिमुख कार्याचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com