रत्नागिरी ः गरिबांवर कारवाई केली तर सेना स्टाईल जाब

रत्नागिरी ः गरिबांवर कारवाई केली तर सेना स्टाईल जाब

गरिबांवर कारवाई केली तर सेना स्टाईल जाब

बंड्या साळवी ; फेरीवाल्यांवर सूडबुद्धीने कारवाई नको

रत्नागिरी, ता. ५ः शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या बाजूला तसेच फूटपाथवर ग्रामीण भागातील महिला, बेरोजगार, छोटे स्टॉल, हातगाडीच्या माध्यमातून व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशा स्थानिक गरीब फेरीवाल्यांवर सूडबुद्धीने रत्नागिरी पालिकेने कारवाई करण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने जाब विचारू. त्यामुळे पालिका प्रशासनाने कारवाई करताना शंभरवेळा विचार करावा, असा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी यांनी दिला.
शहरातील बेकायदेशीर फेरीवाले आणि फूटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच व्यापाऱ्यांनीही याबाबत तक्रारी केल्यामुळे कारवाई सुरू झाली आहे. याबाबत ते पत्रकारांशी अनौपचारिक बोलत होते. शहरात एसटी स्टँडपासून लक्ष्मीचौकपर्यंत शहरानजीक असलेल्या गावातील महिला, बेरोजगार तरुण स्टॉल लावून किंवा फूटपाथवर बसून आपला व्यवसाय पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. कोणाच्या तरी सांगण्यावरून रत्नागिरी पालिकेने या गरीब जनतेवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. रत्नागिरी पालिकेने वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. ज्यांनी तक्रारी केल्या आहेत, त्यांच्या व्यवसायावर फूटपाथवरील स्टॉलमुळे कधीही परिणाम होणार नाही. कारण, दुकानात खरेदीसाठी येणारा ग्राहक केव्हाही फूटपाथवर खरेदी करत नाही तर फूटपाथवर खरेदी करणारा ग्राहक कधीही दुकानात जाऊन खरेदी करणे त्याला परवडत नाही. त्यामुळे व्यापारीही आमचेच आहेत; परंतु हातावर पोट असलेल्या गरिबांवर कारवाई करू नका, अशी साळवी यांची मागणी आहे.

व्यापाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
ज्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होतो. तेथे संबंधितांना पोलिस समज देतील. शेतमाल, कर्ज काढून खरेदी केलेले साहित्य जप्त करून गरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला शिवसेना स्टाईलने जाब विचारू, असा इशारा साळवी यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे. साळवी यांनी याबाबत जाहीर वक्तव्य केल्यामुळे आता व्यापाऱ्यांची भूमिका काय असणार, याकडे लक्ष आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com