शासकीय कामात अडथळा, आरोपीला शिक्षा व दंड

शासकीय कामात अडथळा, आरोपीला शिक्षा व दंड

१६ (पान ३ साठी)

शासकीय कामात अडथळा प्रकरणी एकास शिक्षा

रत्नागिरी, ता. ५ ः तपासाचे काम करत असताना पोलिस ठाण्यात येऊन शासकीय कामात अडथळा करणाऱ्याला न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला एक वर्ष साधा कारावास आणि ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
वैभव लहुराज खराडे (वय ३५, रा. पेठकिल्ला, रत्नागिरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संशयिताविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे यांनी तक्रार दिली होती. बेपत्ता प्रकरणाचा तपास त्यांच्यावर सोपवण्यात आला होता. पोलिसांना चौकशीसाठी दोघांना २८ जानेवारी २०२१ ला शहर पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्या वेळी संशयित वैभव खराडे त्या ठिकाणी अचानकपणे आला. त्याने मित्राची तुम्ही चौकशी करणारे कोण? असे विचारत मोठमोठ्याने वाद घातला. पोलिसांनी त्याला शांत रहाण्यास सांगितले; परंतु तो आकाश साळुंखेंच्या अंगावर धावून गेला होता. इतर पोलिसांनी त्याला थांबवले; पण त्याने टेबलावरच्या काच रागाने उचलून जोरात आपटून फोडली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. वर्षा प्रभू यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी आरोपी वैभवला शिक्षा सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com