रेडी-शिरोडा झुलत्या पुलासाठी 
केंद्रीयमंत्री नाईक यांना निवेदन

रेडी-शिरोडा झुलत्या पुलासाठी केंद्रीयमंत्री नाईक यांना निवेदन

01013
रेडी ः केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन देताना प्रीतेश राऊळ. सोबत प्रसन्ना देसाई व इतर.

रेडी-शिरोडा झुलत्या पुलासाठी
केंद्रीयमंत्री नाईक यांना निवेदन
वेंगुर्ले, ता. ६ ः रेडी यशवंत गड ते शिरोडा वेळागर झुलता पूल प्रस्ताव मंजुरी मागणी संदर्भात जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन मागणीसंदर्भात निवेदन दिले.
यावेळी भाजपचे शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, रवींद्र शिरसाट, भूषण सारंग उपस्थित होते. जिल्ह्यातील पर्यटकांच्या पहिल्या पसंतीचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले शिरोडा वेळागर व रेडी यशवंतगड येथील समुद्र किनारा जोडणारा असा हा झुलता पूल झाल्यास पर्यटनस्थळाचा केंद्रबिंदू म्हणून हा परिसर प्रसिद्धीत येऊ शकतो. त्याचप्रमाणे पर्यटन व्यवसायाच्या अनुषंगाने रोजगार संधी प्राप्त होऊ शकणार आहेत. शिरोडा समुद्र किनारा व रेडी द्विभुज गणेश मंदिर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता कोकणात मुख्यत्वे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये जास्त आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी पर्यटन विकासाच्या माध्यमातून स्थानिक रोजगारात मोठ्या प्रमाणात संधी प्राप्त होऊ शकतात, असे निवेदनात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com