वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रातील 31 गावांमध्ये होणार देशी वृक्ष लागवड

वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रातील 31 गावांमध्ये होणार देशी वृक्ष लागवड

१४ ( पान ५, मेन)

वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रात वृक्ष लागवड

३१ गावांत मोहीम ; नियोजनबद्ध आराखडा ; देशी झाडांनाच पसंती

सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ६ ः वाशिष्ठी व शिवनदी गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नाम फाउंडेशनने चिपळूण तालुक्यात वृक्षलागवडीसाठीही मोठे योगदान देण्याचा निर्धार केला आहे. गेल्या महिन्यात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीनुसार, वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रातील पूर्वेकडील ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक प्रजाती देशी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. तालुक्यातील तब्बल ३१ गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी नाम फाउंडेशनने प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत वृक्ष लागवडीसंदर्भात नियोजनबद्ध आराखडा तयार करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची विनंती केली आहे.
शासनाकडून ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान राबवले जात आहे. या अभियानातून नदी संवर्धनासंदर्भात जनजागृती, नदीचा अभ्यास, समस्या व त्यावरील उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत. त्यानुसार येथील जलदूत शाहनवाज शाह यांची नदी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत रामशेठ रेडीज, शामल कदम, अजित जोशी, पृथ्वीराज पवार, दिगंबर सुर्वे, मंदार चिपळूणकर, धनश्री जोशी यांच्यासह काही सहकारीही काम करत आहेत. गेल्या महिन्यात चिपळूण पंचायत समिती सभागृहात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानांतर्गत बैठक पार पडली. या वेळी वाशिष्ठी नदीला येणारा पूर तसेच महापुराची अनेक कारणे पुढे आली. यामध्ये साचणारा गाळ हे सुद्धा प्रमुख कारण असल्याची चिंता अनेकांनी व्यक्त केली होती. सह्याद्रीच्या खोऱ्यात तसेच वाशिष्ठी पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जमिनीची धूप होते. भूस्खलनासारखी नैसर्गिक आपत्ती ओढावते. पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरची माती नदीत जाऊन वाशिष्ठी नदी व उपनद्या गाळाने भरतात. यावर उपाययोजना करण्यासाठी वाशिष्ठी पाणलोट क्षेत्राच्या पूर्वभागात मोठ्या प्रमाणावर स्थानिक प्रजातीची देशी वृक्ष लागवड करण्याचा विषय पुढे आला. त्यावर एकमत झाले. या उपक्रमासाठी नाम फाउंडेशनच्या प्रतिनिधींनीही सहकार्याची तयारी दर्शवली.
नाम फाउंडेशनने या संदर्भात येथील प्रांताधिकारी प्रवीण पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून, वृक्ष लागवडीचा नियोजनबद्ध आराखडा तयार करून परिपूर्ण प्रस्ताव नाम फाउंडेशनला पाठवण्याची विनंती केली आहे. त्यानुसार पं. स. कृषि विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना पत्र पाठवत वृक्ष लागवडीसाठी आवश्‍यक असणाऱ्या जागेची तपशीलवार माहिती मागितली आहे.

-------
या गावांमध्ये होणार वृक्ष लागवड

पोफळी, शिरगांव, मुंढेतर्फे चिपळूण, पिंपळी खुर्द, पिंपळी बु., चिंचघरी, खेर्डी, कुंभार्ली, कोंडफणसवणे, अलोरे, कोळकेवाडी, नागवे, पेढांबे, ओवळी, नांदिवसे, स्वयंदेव, राधानगर, खडपोली, तिवरे, रिक्टोली, कादवड, तिवडी, दादर, कळकवणे, आकले, गाणे, वालोटी, निरबाडे, खांदाटपाली, दळवटणे व मोरवणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com