पावस ः नियम मोडणाऱ्या 369 वाहनचालकांवर कारवाई

पावस ः नियम मोडणाऱ्या 369 वाहनचालकांवर कारवाई

टुडे पान २ साठी मेन)

००९८१

नियमभंग करणाऱ्या ३६९ वाहनचालकांवर कारवाई
पूर्णगड सागरी पोलिस ः २ लाख १६ हजार रुपये दंड वसूल
पावस, ता. ६ ः वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्यांत नियम मोडणाऱ्या ३६९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, २ लाख १६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे.
पावस हे पर्यटनक्षेत्र असल्यामुळे पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर अनेक उद्योगधंदे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करतात. अनेक वाहनचालक नियमांचे पालन करत नाहीत. वाहन चालवताना वाहनांचा वेग कमी न करणे, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्टचा वापर न करणे अशा अनेक नियमांचे उल्लंघन होते. यासाठी पोलिस ठाण्याच्या वतीने अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या वेळी वाहनांची तपासणी केली गेली. वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी पोलिसांनी कंबर कसली. पोलिसांच्या माध्यमातून नियमांचे पालन करावे यासाठी वारंवार नाकाबंदी करण्यात आली. नियम पायदळी तुडवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी वाहन तपासणी करत दंडात्मक कारवाईचा बगडा उगारला आहे. जानेवारीमध्ये १५३ वाहनचालकांवरती कारवाई करून ९६ हजार रु. दंड वसूल करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यामध्ये ८५ वाहनचालकांवरती कारवाई करून ५१ हजार ९०० रुपयांचा दंडवत करण्यात आला. मार्च महिन्यामध्ये ४९ वाहनचालकांवरती कारवाई करून २१ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर एप्रिलमध्ये ८२ वाहनचालकांवर कारवाई करून ४७ हजार असा चार महिन्यांत एकूण ३६९ वाहनचालकांवर कारवाई करून २ लाख १६ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोट
आम्ही प्रत्येक वाहनचालकांना वाहतुकींच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रबोधन करतो. प्रत्येकवेळी नियमांचे पालन करा म्हणजे तुम्हाला आर्थिक नुकसान बसणार नाही. आम्हाला प्रत्येकवेळी कारवाई करणे चुकीचे वाटते; परंतु नियमांचे पालन करत नसल्यामुळे कारवाई करण्याची पाळी येते यासाठी प्रत्येक वाहनचालकाने नियमांचे योग्य पालन करणे. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.

- इदाते, पोलिस अंमलदार पूर्णगड पोलिस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com