गिर गायींचे संवर्धन आवश्यक

गिर गायींचे संवर्धन आवश्यक

01201
पावशी ः शेतकरी तानाजी सावंत यांचा सत्कार करताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण. शेजारी रवींद्र सुर्वे, रणजित देसाई आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

गिर गायींचे संवर्धन आवश्यक

पालकमंत्री चव्हाण; पावशीत गोवंश वृद्धी कृषी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ७ ः भविष्यात समाज सुदृढ व्हायचा असेल तर गिर गायीसारख्या देशी गायींचे संवर्धन झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पावशी येथे केले. ते गोवंश वृद्धीसाठी आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांना गिर गायींचे वाटप तसेच शेतकऱ्यांचा सत्कार सोहळाही झाला.
पावशी-मिटक्याचीवाडी येथे गोवंश वृद्धीसाठी कृषी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री चव्हाण, रवींद्र सुर्वे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, भाजपचे पदाधिकारी राजू राऊळ, पावशी माजी सरपंच पप्या तवटे, गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदी उपस्थित होते. पालकमंत्री चव्हाण म्हणाले, ‘‘कोरोना काळामध्ये पूर्ण जग हादरले होते. जे देश महासत्ता समजतात, त्यांनी छोट्या देशांची साथ सोडली होती; पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हिंदू धर्मातील ज्या गोष्टी, जे संस्कार सांगितले आहेत, त्यानुसार काम केले. या महामारीमध्ये आपला देश वाचला, तो आपल्या संस्कृतीमुळे. आपल्या देशामध्ये जे गायीचे महत्त्व सांगितले आहे आणि त्या गायीच्या दुधापासून ते शेणापर्यंत होणारी खत निर्मिती, आरोग्यासाठी उपयुक्त असणारे गोमूत्र याचा प्रभाव होता. त्यामुळे भविष्यात समाजाचे आरोग्य सुदृढ राहिले पाहिजे तर गिर गायींसारख्या देशी गायींचे संवर्धन झाले पाहिजे. श्री. सुर्वे हे काम करत आहेत. इतर शेतकऱ्यांनीही गायींचे संवर्धन करून त्यापासून निर्माण होणारी उत्पादने घेतली पाहिजेत. शेतीसोबत पूरक व्यवसाय केले पाहिजेत.’’ या कार्यक्रमात शेतकऱ्यांना गिर गायींचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये प्रगती केली आहे, त्यांचा सत्कार करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com