मालवणातील युवा उद्योजक गावडेंसह
भाजप कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

मालवणातील युवा उद्योजक गावडेंसह भाजप कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

०१२५३

मालवणातील युवा उद्योजक
गावडे कार्यकर्त्यांसह मनसेत
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ७ : येथील युवा उद्योजक प्रितम गावडे यांनी रत्नागिरीत जाहीर सभेत राज ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. याचबरोबर मालवण मधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनीही मनसेमध्ये जाहीर प्रवेश असल्याची माहिती अमित इब्रामपूरकर यांनी दिली.
येथील युवा उद्योजक प्रितम गावडे यांनी रत्नागिरीत जाहीर सभेत आपल्या सहकाऱ्यांसोबत ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. गावडे यांच्या सोबत गणेश सातार्डेकर, राहुल मोंडकर, लौकिक मेथर, तथागत मालवणकर, चिन्मय कुणकवळेकर, प्रमोद डिचवलकर, रोहन तावडे, हर्ष जोशी हे उपस्थित होते. या प्रवेशासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत, मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमित इब्रामपूरकर, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनविसे कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र राज्य व रत्नागिरी सिंधुदुर्गचे संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल, मनविसे तालुकाध्यक्ष संदीप लाड यांनी विशेष प्रयत्न केले. प्रितम गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशाने मालवण मनसेला नवसंजीवनी मिळेल तसेच लवकरच मालवणात पक्ष प्रवेशाचा सपाटा सुरु होणार असल्याचे मनसेच्या श्री. इब्रामपूरकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com