जिल्हा परिषदेसह कुडाळचे वर्चस्व

जिल्हा परिषदेसह कुडाळचे वर्चस्व

01472
सिंधुदुर्गनगरी : राज्यस्तरीय मूल्यमापन समितीच्या प्रमुख सुषमा देसाई यांचे स्वागत करताना प्रशासक प्रजित नायर. सोबत प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील.

जिल्हा परिषदेसह कुडाळचे वर्चस्व

‘यशवंत पंचायत राज’; राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी समिती दाखल

ओरोस, ता. ८ ः यशवंत पंचायत राज अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व कुडाळ पंचायत समितीने कोकण विभागातील वर्चस्व कायम राखले आहे. २०२०-२१ मधील मूल्यमापनमध्ये पुन्हा कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविला. दरम्यान, या दोन्ही स्थानिक स्वराज्य समितीचे राज्यस्तरीय मूल्यमापन करण्यासाठी समिती आज जिल्ह्यात दाखल झाली आहे.
त्या-त्या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागांची दप्तर तपासणी, सभेचे कामकाज, झालेला खर्च आणि करण्यात आलेली वैशिष्टयपूर्ण कामे याचे मूल्यमापन करून यशवंत पंचायत राज अभियानात क्रमांक काढले जातात. २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद व कुडाळ पंचायत समितीने यामध्ये कोकण विभागातील पाच जिल्ह्यात सर्वात वरचढ काम केले आहे. याचा निकाल कोकण आयुक्तांनी नुकताच जाहीर केला आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद व कुडाळ पंचायत समितीचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यस्तरीय समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. या समितीने आज जिल्हा परिषद व कुडाळ पंचायत समितीला भेट देत येथील दप्तर, झालेला खर्च, सभेचे कामकाज आणि वैशिष्ट्यपूर्ण काम याची तपासणी केली. या समितीचे प्रमुख सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई या असून सांगली जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे यांचा यात समावेश आहे. जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी समितीचे स्वागत केले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचलक डॉ. उदय पाटील, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
---------------
चौकट
जिल्हा परिषदेचेही सातत्य
यशवंत पंचायत राज अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने कोकण विभागात यशस्वी सातत्य राखले आहे. २०१६-१७, २०१७-१८ या वर्षात प्रथम क्रमांक मिळविला. २०२८-१९ मध्ये मूल्यमापन करण्यात आले नव्हते. पुन्हा २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर २०१६-१७ मध्ये द्वितीय, २०१७-१८ मध्ये प्रथम, २०१८-१९ मध्ये मूल्यमापन झाले नाही. २०१९-२० मध्ये तृतीय क्रमांक मिळविला होता. आता २०२०-२१ साठी राज्यस्तरीय मूल्यमापन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com