-राज्यात पहिली मोफत वायफाय सुविधा आरटीओमध्ये

-राज्यात पहिली मोफत वायफाय सुविधा आरटीओमध्ये

२८ (पान ३ साठी)

राज्यात पहिली मोफत वायफाय सुविधा आरटीओमध्ये

ओपन टू ऑल ; सुविधांमुळे ४० टक्के कामाचा भार कमी

रत्नागिरी, ता. ०८ : आरटीओ कार्यालयात येणाऱ्या वाहनधारकांना दोन वेगवेगळ्या प्रणालीच्या माध्यमातून ९ ऑनलाईन सुविधा सुरू केल्या आहेत. या सुविधांचा वापर करताना नेटवर्कचा कोणताही त्रास होऊ नये म्हणून ओपन टू ऑल, अशी फ्री वायफाय सुविधा सुरू केली आहे. राज्यातील आणि जिल्ह्यातील हा पहिला उपक्रम आहे. यामुळे कार्यालयावरील ४० टक्के कामाचा भार कमी झाला आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, अशी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, वाहन आणि सारथी या दोन वेगवेगळ्या प्रणालीच्या माध्यमातून ९ ऑनलाईन सुविधा सुरू केल्या आहेत. १ मेपासून परिवहन विभागातील या सेवा ऑनलाईन पद्धतीने झाल्या आहेत. त्यापैकी सारथी प्रणालीवर असणाऱ्या सेवा नवीन शिकाऊ परवाना, नवीन चालक परवाना, नवीन वाहक परवाना, परवान्याची माहिती आणि दुय्यम परवाना तर वाहनप्रणालीद्वारे आकर्षक क्रमांक शोधणे, राष्ट्रीय परवाना, दुय्यम नोंदणी पुस्तक पत्त्यावरील बदल, मालमत्तेचे हस्तांतरण इत्यादी १३ सुविधा फेसलेस पद्धतीने या कार्यालयात सुरू करण्यात आल्या आहेत. मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे कार्यालयात येणाऱ्या जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फ्री वायफाय सुविधा १ मे पासून सुरू केली आहे. तुमचा नंबर एंटर करायचा, ओटीपी आला की लगेच वायफाय कनेक्ट होते. जनतेसाठी फ्री सुविधा देणारे रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पहिले आहे. जिल्ह्यात देखील अशी सुविधा कोणतेही ऑफिस देत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. या ऑनलाईन सुविधा झाल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा कामाचा ४० टक्के भार कमी झाला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com