किल्ले चंदेरीची मोहीम प्रथमेश वालमकडून फत्ते

किल्ले चंदेरीची मोहीम प्रथमेश वालमकडून फत्ते

४ (टुडे पान १ साठी, अॅंकर)


-rat९p८.jpg ः
२३M०१६२२
राजापूर ः किल्ले चंदेरीची मोहीम फत्ते केलेला प्रथमेश वालम.
---

किल्ले चंदेरीची मोहीम प्रथमेश वालमकडून फत्ते

पडवेतील तरुण ; प्रतिकूल स्थितीतही नियमित सरावामुळे यश

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ९ ः रखरखते ऊन, वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा, काहीशी घसरडी असलेली अवघड वाट आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीशी दोन हात करत तालुक्यातील पडवे येथील प्रथमेश वालम याने अंबरनाथ येथील बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेला किल्ले चंदेरी सर करण्याची मोहीम फत्ते केली आहे. शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणाऱ्‍या किल्ले चंदेरीची मोहीम त्याने सुमारे चार तासांमध्ये फत्ते केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या विविधांगी किल्ले शालेय जीवनामध्ये पाठ्यपुस्तकांमधून अभ्यासल्याने त्यांच्याबाबत प्रथमेश यांना नेहमीच आकर्षण राहिले. त्यातून, छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी आणि कार्यपद्धतीतून प्रेरित होऊन सह्याद्रीतील गडकोट व निसर्ग भटकंतीचे वेड लागल्याचे प्रथमेश सांगतात. पुणे येथे नोकरी करत असतानाही त्यांनी गडकिल्ले सर करण्याचा छंद कायम जोपासताना दूर्गवीर प्रमोद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १२५ हून अधिक गडकिल्ले आजपर्यंत सर केले आहेत. प्रथमेश यांनाही किल्ले चंदेरी आकर्षण राहिले असून त्यांनी हा किल्ला सर करण्याचा निर्धार केला. उभा आणि घसरडा असलेला काहीसा सिंहासनारूढसारखा किल्ला प्रस्तरारोहण करणे शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारा असतो. त्यामुळे त्याची मानसिक आणि शारीरिक तयारी त्यांनी नाशिकच्या पॉईंट ब्रेक अ‍ॅंड व्हेंचर टीमचे गिर्यारोहक जॉकी साळुंखे, चेतन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव केला. त्याच्या जोडीला यापूर्वी गडकिल्ले सर केल्याचा अनुभवही गाठीशी होता. त्याच्या जोरावर त्यांनी रूपेश बंडबे, शिवाजी बोडके, आकाश शेलार, अश्‍विनी अनिवसे या सहकाऱ्‍यांसोबत निसरडे दगड अन् वाट, कडक ऊन, सोसाट्याचा वारा आणि त्यातून निर्माण झालेली प्रतिकूल स्थिती आदींचा सामना करत किल्ले चंदेरी सर करण्याची मोहीम फत्ते केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com