परिचर आंदोलनाचा उपकेंद्रांच्या कामावर परिणाम

परिचर आंदोलनाचा उपकेंद्रांच्या कामावर परिणाम

७ (टुडे पान १ साठी)


- rat९p१६.jpg-

मुंबई ः आंदोलनात सहभागी महिला परिचर.
-----------

आंदोलनाचा उपकेंद्रांच्या कामावर परिणाम

परिचरांची मुंबईत आठ दिवस धरणे ः जिल्ह्यातील दीडशे महिलांचा सहभाग

रत्नागिरी, ता. ९ ः जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील १९६६ पासून सेवेत कार्यरत असलेल्या महिला परिचरांनी विविध मागण्यांसाठी सरकार विरोधात मुंबईतील आझाद मैदानात सलग आठ दिवस आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका या महिलांनी घेतल्याने जिल्ह्यातील ३७८ उपकेंद्रांचा कारभार विस्कळीत झाला आहे.
मानधनात वाढ मिळावी, नेहमीत सेवेत कायम करावे, अंशकालीन नावात बदल करावे, रिक्त पदांवर वारसदारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, दरवर्षी गणवेष व भाऊबिजेसाठी २००० रुपये देण्यात यावेत, दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत मानधन अदा करावे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आझाद मैदान येथे सुरू आहे. यासाठी जिल्हाभरातून दीडशे महिला परिचर या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकांक्षा कांबळे, सुप्रिया पवार, संचिता घवाळी, जया तोडणकर, स्वराली आग्रे, श्रृतिका सावंत, नम्रता नार्वेकर, विनया कदम, कुंदा सिगम, आश्विनी यादव, मोहिनी सुर्वे, रेश्मा कांबळे, प्रमिला जाधव, विद्या पवार, मिनाक्षी मोहिनी, मनिषा नार्वेकर आदी उपस्थित होत्या. सलग आठव्या दिवशी हे आंदोलन सुरूच आहे. जिल्ह्यातील ३७८ आरोग्य उपकेंद्रांतील सर्वच महिला सहभागी झाल्याने कारभार विस्कळित झाला आहे.
------
कोट
आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. गेली काही वर्षे मागण्यांसाठी झगडत आलो आहोत. मात्र प्रत्येकवेळी त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
- आकांक्षा कांबळे, जिल्हाध्यक्ष, महिला परिचर संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com