ॊ‘खर्गेंना धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करा’

ॊ‘खर्गेंना धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करा’

01724
वेंगुर्ले ः मनिकांत राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी जिल्हा काँग्रेसतर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले.

ॊ‘खर्गेंना धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करा’
वेंगुर्ले ः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना धमकी देणाऱ्या मनिकांत राठोडवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे केली आहे. तशा आशयाचे निवेदन येथील पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे चित्तपूर (कर्नाटक) विधानसभेचे उमेदवार मनिकांत राठोड यांनी दिलेल्या धमकीमुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे राठोड यांच्यावर क्रिमिनल प्रोसिजर कोड अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करावा. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, मुंबई शिवडी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार आणि कोचरा गावचे सुपुत्र उदय फणसेकर, वेंगुर्ले शहराध्यक्ष प्रकाश डिचोलकर, कोचरा माजी सरपंच सुनिल करलकर, पुरुषोत्तम हंजनकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com