परशुराम घाट 7 तास बंद

परशुराम घाट 7 तास बंद

पान १ साठी)

१६७५
१७५९

परशुराम घाट ७ तास बंद
पावसाने रस्त्यात चिखल; अवजड वाहने अडकली
चिपळूण, ता. ९ ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणांतर्गत केलेल्या भरावाच्या ठिकाणी पावसाने रस्ता चिखलमय बनला. यात काही अवजड वाहने अडकून पडल्याने मंगळवारी पहाटे घाटातील वाहतूक ठप्प झाली. चिखल बाजूला केल्यानंतर सकाळी ११ वाजता वाहतूक पूर्ववत सुरू केली; मात्र या कालावधीत परशुराम घाटासह पर्यायी चिरणी मार्गावरदेखील वाहतूक कोंडी झाली होती. या वादळी पावसामुळे परशुराम घाटातील वाहतूक सात तास ठप्प होती.
सोमवारी (ता. ८) तालुक्यातील पूर्व विभागात सायंकाळी वादळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर चिपळूण शहर व परिसरात पहाटे ३ पासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढला. या पावसाचा सर्वाधिक फटका परशुराम घाटाला बसला. या घाटात नव्याने केलेल्या भरावात पावसामुळे चिखल झाला. त्यामुळे घाटातून जाणारी अवजड वाहने चिखलात अडकून पडली. घाटात वाहने अडकल्याने तत्काळ वाहतूक थांबवली. त्यानंतर चिखल जेसीबीच्या साहाय्याने हटवून त्या ठिकाणी खडी पसरवली. त्याने अडकलेली वाहने बाहेर पडली; मात्र उर्वरित भागात चिखल कायम होता. त्यामुळे वाहतूक सुरू न करता दोन पोकलेनच्या साहाय्याने रस्त्यावरील माती बाजूला करण्यात आली. त्यानंतर परशुराम घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. या वेळी घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे येथे वाहतूक पोलिसांना पाचारण करत टप्प्याटप्प्याने वाहने सोडण्यात येत होती. छोटी वाहने पर्यायी चिरणी मार्गाने सोडली जात होती. चिरणी मार्गावर देखील एकाचवेळी वाहनांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
परशुराम घाटात सध्या दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत वाहतूक बंद ठेवून चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. १० मे पर्यंत या पद्धतीने घाटातील काम चालणार आहे; मात्र अजूनही १०० मीटरपेक्षा अधिक लांबीचे काँक्रिटीकरणाचे काम शिल्लक आहे. हे काम जोवर पूर्ण होत नाही तोवर चिखलमय रस्त्याचा धोका कायम राहणार आहे. त्यातच घाटातील अवघड वळणावर असलेला कातळ फोडण्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे काँक्रिटीकरणाला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरू असताना काँक्रिटीकरणाचे काम करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

चौकट
सर्व अधिकारी मुंबईत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवाच्या चौपदरीकरणासंदर्भात मुंबईत बैठक बोलावली होती. त्यामुळे घटना घडली तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी मुंबईत होते. त्यामुळे कल्याण टोलवेज या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळली आणि महामार्ग सुरळीत केला.


कोट
परशुराम घाटातील टप्पा क्रमांक चार हा धोकादायक आहे. या घाटात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन चार पोकलेन, दोन जेसीबी, दहा डंपर आणि एक ब्रेकर अशी यंत्रणा तैनात ठेवली आहे.
- अमोल माडकर, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com